विवाहितेचा वारंवार छळ करुन घरासाठी 25 लाखांची मागणी पाच जणांवर गुन्हा दाखल

- Advertisement -

परवेज शेख विवाहितेचा वारंवार छळ करुन घरासाठी 25 लाखांची मागणी, पाच जणांवर गुन्हा दाखल.सांगवी : सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ करुन घर घेण्यासाठी माहेराहून 25 लाख रुपये आणण्याची मागणी केली. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मार्च 2009 ते 6 नोव्हेंबर 2019 या कालावधीत जुनी सांगवी येथे घडली.

कुंदन शेषराव कसबे (वय 38), सासरे शेषराव कबसे (वय 66), सासू नंदा कसबे (वय 60), दीर नरेंद्र कसबे (वय 32) आणि नणंद वर्षा जीवन कांबळे (वय 34, सर्व रा. पवारनगर, जुनी सांगवी), अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत 33 वर्षीय विवाहितेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून विवाहितेकडे नवीन घर व गाडी घेण्यासाठी माहेराहून 25 लाख रुपये आणण्याची मागणी केली. यासाठी वेळोवेळी शिवीगाळ आणि हाताने मारहाण करीत त्यांचा शारीरिक व मानसिक छळ केला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सांगवी पोलीस करीत आहे.

- Advertisement -