हायलाइट्स:
- नसीरुद्दीन शाह स्वतःपेक्षा १६ वर्षांनी मोठ्या परवीन यांच्याशी केलं होतं लग्न
- विवाहित असूनही रत्ना पाठक यांच्या प्रेमात पडले होते नसीरुद्दीन शाह
- नसीरुद्दी शाह काही वर्षं रत्ना पाठक यांच्यासोबत राहत होते लिव्ह इनमध्ये
नसीरुद्दीन शाह यांना पहिल्यांदा स्वतःपेक्षा १६ वर्षांनी मोठ्या असलेल्या परवीन मुराद यांच्या प्रेमात पडले. त्यावेळी ते केवळ २० वर्षांचे होते. परवीन या प्रसिद्ध अभिनेत्री सुरेखा सीकरी यांची बहीण होत्या. १९६९ मध्ये परवीन आणि नसीरुद्दीन यांनी लग्न केलं. पण या दोघांचं हे लग्न फार काळ टिकलं नाही. पण परवीन यांच्याशी लग्न झालेलं असतानाही नसीरुद्दी शाह रत्ना पाठक यांच्या प्रेमात पडले होते.
राज कुंद्रानं बायकोला दिल्या कोट्यवधींच्या भेटवस्तू, वाचा यादी
नसीरुद्दीन आणि रत्ना पाठक यांची पहिली भेट १९७५ साली अभिनयाचं शिक्षण घेत असताना झाली होती. दोघंही एका नाटकाच्या वेळी पहिल्यांदा भेटले होते. सत्यदेव दुबे यांचं दिग्दर्शन असलेल्या ‘संभोग से संन्यास तक’ नावाचं एक नाटक होतं. या नाटकाच्या दरम्यान या दोघांची ओळख वाढली. भेटी वाढल्या आणि त्यातूनच या दोघांमधील जवळीक वाढत गेली.
नसीरुद्दीन शाह यांच्यासोबत पहिल्या भेटीबद्दल बोलताना रत्ना पाठक म्हणाल्या, ‘हे पहिल्या नजरेत झालेलं प्रेम नव्हतं. दुबे यांनी जेव्हा आमची ओळख करून दिली होती. तेव्हा तर मला यांचं नावही व्यवस्थित माहीत नव्हतं. पहिल्या दिवशी आम्ही मित्र देखील नव्हतो. पण दुसऱ्या दिवशी आम्ही एकत्र फिरू लागलो.’ नसीरुद्दीन शाह आणि रत्ना पाठक लग्नाआधी काही वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिले होते. जवळपास ७ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर १९८२ साली या दोघांनी लग्न केलं. दरम्यान नसीरुद्दीन आणि परवीन यांच्या घटस्फोटाच्या प्रक्रियेला वेळ लागत असल्यानं रत्ना आणि नसीरुद्दीन यांनी लिव्ह इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता.
पॉर्न सिनेमे बनवणाऱ्या होऊ शकते कठोर शिक्षा जाणून घ्या नियम
परवीन आणि नसीरुद्दीन यांना हीबा नावाची एक मुलगी आहे. नसीरुद्दीन आणि परवीन यांचा घटस्फोट झाल्यानंतर आपल्या मुलीला घेऊन परवीन इराणला गेली. पण काही वर्षांनी हीबा नसीरुद्दीन यांच्याकडे परतली. त्यानंतर ती रत्ना आणि नसीरुद्दीन यांची मुलं इमाद आणि विवान यांच्यासोबतच लहानाची मोठी झाली. नसीरुद्दीन आणि रत्ना यांनी ‘मिर्च मसाला’ आणि ‘द परफेक्ट मर्डर’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे.