Home ताज्या बातम्या विवेकानंद केंद्र कन्याकुमारी शाखा-एरंडोल च्या वतीने आयोजित रक्तदान शिबीरात १४५ रक्तदात्यांनी केले रक्तदान

विवेकानंद केंद्र कन्याकुमारी शाखा-एरंडोल च्या वतीने आयोजित रक्तदान शिबीरात १४५ रक्तदात्यांनी केले रक्तदान

0

प्रतिनिधी : एरंडोल येथील विवेकानंद केंद्र कन्याकुमारी शाखेच्या वतीने दि१९ रोजी सायंकाळी पाच वाजता संपन्न झाले.सदर रक्तदान शिबीर माधवराव गोळवलकर गुरुजी रक्तपेढी व विवेकानंद केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते.सदर रक्तदान शिबीरामध्ये १४७ रक्तदात्यांनी रक्तदान केले.रक्तदान शिबीराचे उद्घाटन सकाळी ९-३० वाजता एरंडोल पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच त्यांनी देखील रक्तदान केले.दिवस भरात अनेक प्रतीष्ठीत व्यक्तिनी शिबीर स्थळाला भेट दिली.यामध्ये शालीकग्राम गायकवाड, उल्हास लढ्ढा, डॉ.सुयश पाटील, डॉ.इब्राहिम बोहरी, डॉ.मकरंद पिंगळे व डॉ.पी.जी.पिंगळे,डॉ.कैलास पाटील,डॉ.उमाकांत मराठे,डॉ.अमेय राठी,प्रा.एस.आर.पाटील, मराठे,महाले उपस्थित होते.रक्तदान शिबीरयशस्वीपणे पार पाडण्यासाठी विवेकानंद केंद्राच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.गत सात वर्षांपासून विशेष सहकार्य करणाऱ्या मध्ये उल्लेखनीय कामगिरी म्हणजे एरंडोल येथील प्रसीद्धकल्पना हाॅस्पिटल चे संचालक डाॅ. राहुल पाटील यांनी रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांना विवेकानंदांच्या विचारांचे एक पुस्तक भेट देऊन गौरविले.यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी देखील रक्तदान केले.
फोटो ओळी – एरंडोल येथे रक्तदान शिबिरात रक्तदान करतांना सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल उनवणे,सोबत शालिग्राम गायकवाड, रविंद्र पाटील,नरेंद्र डागा.
२)स्वामीविवेकानंद यांच्या प्रतिमेचे पुजन करतांना सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल उनवणे,रविंद्र पाटील,शालिग्राम गायकवाड व केंद्राचे कार्यकर्ते.