Home ताज्या बातम्या विश्रांतवाडी : युवकाच्या खून प्रकरणी 5 आरोपी गजाआड : गुन्हे शाखा युनिट 4 ची कामगिरी

विश्रांतवाडी : युवकाच्या खून प्रकरणी 5 आरोपी गजाआड : गुन्हे शाखा युनिट 4 ची कामगिरी

0

विश्रांतवाडी : युवकाच्या खून प्रकरणी 5 आरोपी गजाआड : गुन्हे शाखा युनिट 4 ची कामगिरी

पुणे : परवेज शेख , दि.1 जुन : विश्रांतवाडी येथील युवकाच्या खून प्रकरणी सर्व आरोपींना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे.
गोकुळ नगर, विश्रांतवाडी या ठिकाणी रात्री 01.30 वा सुमारास इसम नामे अक्षय गागोदेकर,वय 24 वर्षे रा मुंजाबा वस्ती,धानोरी याचा आरोपी नामे -1)इंद्रजीत गुलाब गायकवाड़ वय 23 वर्षे रा गोकुळ नगर,धानोरी 2) निलेश विश्वनाथ शिगवन वय 24 रा गोकुळ नगर,धानोरी 3)विजय कालूराम फंड, वय 25 रा सर्वेन्ट क्वाटर्स, खडकी। 4)सागर राजू गायकवाड़ वय 17 रा सर्वेन्ट क्वाटर्स,खडकी 5)कुणाल बाळु चव्हाण वय 22 रा.बोपखेल, विश्रांतवाडी,पुणे यांनी आरोपी क्रमांक 01 याचे बहीणीस लिव इन रिलेशन शिप मध्ये राहताना त्रास देतो या कारनावरुन दगडांनी मारहाण करून खून करण्यात आला होता,
सदर खुनातील आरोपींचा शोध घेत असताना यूनिट 04 चे पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड,पो हवा मचे,पो ना खुनवे, पो कॉ शेलार व विश्रांतवाडी पो स्टेशन यांनी संयुक्तरित्या सर्च ऑपरेशन राबवून वरील सर्व आरोपिंना ख्रिश्चन स्मशानभूमी,होळकर ब्रीज, खडकी या आर्मी परिसरातून ताब्यात घेण्यात घेतले. व
पुढील तपासासाठी विश्रांतवाडी पो स्टे ताब्यात देण्यात आले आहे.