विश्वनाथन आनंद यांच्या बायोपिकमध्ये आमिर खान?; परफेक्शनिस्टनं केला खुलासा

विश्वनाथन आनंद यांच्या बायोपिकमध्ये आमिर खान?; परफेक्शनिस्टनं केला खुलासा
- Advertisement -


हायलाइट्स:

  • जग्गजेता विश्वनाथन आनंदवर बायोपिक
  • बायोपिकमध्ये आमिर खान करणार काम ?
  • याप्रश्नावर आमिरने दिले त्याच्या अंदाजात उत्तर

मुंबई : अभिनेता आमिर खान त्याच्या आगामी ‘लाल सिंह चढ्ढा’ सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. आमिर त्याच्या परफेक्शनसाठी बॉलिवूडमध्ये ओळखला जातो. याच त्याच्या परफेक्शनमुळे विश्वनाथ आनंदवर तयार होत असलेल्या बायोपिकमध्ये काम करण्यासंदर्भात त्याला जेव्हा विचारले तेव्हा आमिरने त्याच्या खास अंदाजात उत्तर दिले आहे.

कोविड १९ चा विपरीत परिणाम जवळपास सर्वांवर झाला आहे. बुद्धीबळपटूंच्या मदतीसाठी म्हणून एका ऑनलाईन कार्यक्रमात जग्गजेता विश्वनाथन आनंद आणि आमिर खान एकत्र आले होते. तेव्हा विश्वनाथनवर बायोपिकचा काढण्याचा विषय चर्चेत आला. तेव्हा आमिर म्हणाला, ‘प्रश्नच नाही. त्याच्यावर तर सिनेमा व्हायलाच हवा…’ आमिर पुढे म्हणाला, ‘ आनंदची भूमिका साकारायला मिळणे हे केवळ अभिमानास्पदच नाही तर आनंदाचा भाग असेल. केवळ इतकेच नाही तर आनंद कशाप्रकारे विचार करतो, याचा शोध घेणे देखील तितकेच मनोरंजक गोष्ट असेल. मी जेव्हा एखादा बायोपिकमध्ये भूमिका साकारतो तेव्हा नेहमीच त्या व्यक्तीच्या मनाचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. मला देखील आनंदला जर समजावून घ्यायचे असेल तर तो कशा पद्धतीने विचार करतो हे जाणून घ्यावे लागेल. त्यासाठी त्याच्यासोबत खूप सारा वेळ घालवावा लागेल. मला त्याची पत्नी, त्याचे कुटुंबातील इतर सदस्यांशी देखील बोलून आनंद कसा विचार करतो हे जाणून घ्यायला आवडे. जेव्हा केव्हा मी आनंदची भूमिका मोठ्या पडद्यावर साकारीन तेव्हा या सगळ्यांसाठी ते एक मोठ्ठे सरप्राईज असेल हे नक्की…’

आनंदने केली मिश्किल कॉमेन्ट
आमिर हे सगळे सांगत असताना आनंदने एक मिश्लिक कॉमेन्ट केली. आनंद म्हणाला, ‘ आणि मी तुम्हाला वचन देतो की याभूमिकेसाठी तुम्हाला वजन वाढवावे लागणार नाही…’

दरम्यान, जग्गजेता विश्वनाथन आनंदवर बायोपिकच्या निर्मितीचे सर्व अधिकार आनंद एल राय आणि महावीर जैन यांच्याकडे आहेत. या बायोपिकची पटकथा लेखनाच्या अंतीम टप्प्यात आली आहे.मात्र अजूनही या बायोपिकसाठी अभिनेत्याची निवड अद्याप झालेली नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर आमिर खानला जर आनंदची भूमिका साकारण्याची संधी मिळाली तर ती दोघांच्याही चाहत्यांसाठी नक्कीच आनंदाची बातमी असेल, हे नक्की…



Source link

- Advertisement -