सासुओलो (इटली): एसी मिलानच्या राफेल लेओ (rafael leao) ने रविवारी झालेल्या सीरी ए (seriea a) फुटबॉल स्पर्धेत सामना सुरू झाल्यानंतर अवघ्या ६ सेंकदात गोल करून विक्रम केला. सासुओलोच्या विरुद्ध राफेलने केलेला हा गोल इटलीतील देशांतर्गत लीग स्पर्धेतील सर्वात कमी वेळेत झालेला गोल आहे. स्पर्धेतील गुणतक्त्यात अव्वल स्थानी असलेल्या एसी मिलान (ac milan) च्या राफेलने मॅच सुरू होताच हकन कलांघोग्लुच्या किकवर गोल करून सर्वांना धक्का दिला.
वाचा- मित्राचे करोनाने निधन; सचिन तेंडुलकर म्हणाला, मी त्याला…
राफेल लेओने पोतुगालच्या पाओलो पोगीच्या आठ सेकंदाचा विक्रम मोडला. पोगीने २००१ साली फियोरेंटीनाविरुद्ध आठ सेकंदात गोल केला होता. राफेलने केलेल्या गोलनंतर सर्वजण हैराण झाले.
सामना सुरू होताच एखाद्या संघाकडून इतक्या आक्रमक पद्धतीने फार कमी वेळा खेळ केला जातो. या सामन्यात एसी मिलानने २-१ असा विजय मिळवला.
वाचा- भारतीय संघात होणार मोठे बदल; बॉक्सिंग डे कसोटीसाठी अशी सुरू आहे तयारी
- Advertisement -