विहीरीवरील मोटरपंप सुरू करताना शॉक लागून तरुण शेतकऱ्याचा मृ्त्यू

- Advertisement -

 राहुरी:

विहीरीवरील पाण्याचा मोटरपंप सुरू करत असताना वीजेचा धक्का बसुन तरूण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झालाआहे. तालुक्यातील मोमीनआखाडा येथे ही घटना घडली. शशिकांत दत्तात्रय कोहकडे (27) राहणार मोमीन आखाडा हे पिकाला पाणी देण्यासाठी विहीरीवर गेले होते. मोटरपंप सुरू करण्यासाठी स्टार्टर ठेवलेल्या पत्र्याचे खोके उघडत असताना हाताला विद्युत प्रवाहाचा झटका बसून दत्तात्रय जमीनीवर कोसळले.

दत्तात्रय यांना उपचारासाठी राहुरीच्या ग्रामीण रूग्णाल्यात दाखल करण्यात आले मात्र उपचारापुर्वीच त्यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती डॉक्टरांकडुन मिळाली. आज शनिवारी सकाळी राहुरी येथे शवविच्छेदना नंतर दत्तात्रय यांचा मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आला. दुपारी मोमीन आखाडा येथे दत्तात्रय यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. विद्यृत शॉक बसुन मृत्यू झालेल्या दत्तात्रय यांना एक पाच वर्षाचा तर दुसरा सहा महिन्याचा मुलगा आहे. या घटनेने मोमीन आखाडा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -