म. टा. प्रतिनिधी
: पावसाळ्याच्या काळात वीजेच्या धक्क्याची भीती अधिक असते. वीजचोरी होत असल्यास त्यात वीजेचा धक्का लागण्याचा धोका सर्वाधिक असतो. त्यामुळे अतिरिक्त काळजी घेतली जावी, असा सल्ला लिमिटेडने (एईएमएल) त्यांच्या ३० लाख ग्राहकांना दुला आहे.

ग्राहकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत केंद्रीय आपत्कालिन नियंत्रण केंद्राची (सीडीसीसी) पथके अतिदक्षतेवर कार्यरत असून वीजपुरवठ्यात कमीत कमी अडथळा यावा, यासाठी २४ तास काम करीत असल्याचे एईएमएलने म्हटले आहे. वीज पुरवठा खंडित होण्यासह आग लागणे किंवा विजेचा धक्का लागल्यास १९१२२ या २४ बाय ७ हेल्पलाइनवर किंवा केंद्रीय आपत्कालिन नियंत्रण केंद्राच्या (सीडीसीसी) ०२२-५०५४९१११/५०५४७२२५/२९६८८१११ व २९६८८२२५ यावर संपर्क साधावा. कंपनीच्या www.adanielectricity.com या संकेतस्थळाला भेट देता येईल.
- Advertisement -