तेल्हारा तालुक्यात मुसळधार पावसासह विजांचा गडगडाट
अकोला : तेल्हारा तालुक्यातील भोकर व वरुड बुद्रुक येथील शेतशिवारात वीज पडून सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर तीन शेतमजूर गंभीर जखमी झाले आहेत. शेतात काम करत असताना दुपारच्या वेळी ही घटना घडली.
आज दुपारपासून तेल्हारा तालुक्यात मुसळधार पावसासह विजांचा गडगडाट सुरु आहे. सध्या शेतात कापूस वेचणीचे काम सुरु आहे. कापूस वेचणी करत असताना वीज कोसळली. या घटनेत भोकर येथील शेतकरी गणेश वामन मोकळकार (६५) आणि एकाच कुटुंबातील गजानन गुलाब आढाऊ (२८) आणि लक्ष्मी नागोराव अढाऊ (१३) यांचा मृत्यू झाला. तर एकाच घरातील तीन शेतमजुर जखमी झाले आहेत.
जखमींना उपचारासाठी रुग्णायलात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
दुसरीकडे अकोट तालुक्यातील लाडेगाव येथेही वीज पडून एका शेतमजुराचा मृत्यू झाला.