नवी मुंबई : धारदार शस्त्राने वार करुन राहत्या घरात वृध्देच्या हत्येची घटना सोमवारी सकाळी घणसोलीत घडली आहे. पहाटे पती कामानिमित्ताने घराबाहेर गेले असता हा प्रकार घडला आहे. मात्र या घटनेनंतर त्याच इमारतीत राहणारा मयत महिलेचा मुलगा बेपत्ता असल्याने त्याच्यावर संशय व्यक्त होत आहे.
घणसोली येथील घरोंदा वसाहतीमधील सिध्दीविनायक सोसायटीच्या ए/१३ क्रमांकाच्या इमारतीमध्ये हा प्रकार घडला आहे. तिथे राहणारया चंद्रकला भय्ये (६०) यांचा राहत्या घरात मृतदेह आढळून आला. पती यशवंत भय्ये यांच्यासह त्या तिथे रहायच्या. तर त्याच इमारतीच्या तिसरया मजल्यावर त्यांचा मुलगा शेखर हा पत्नी व लहान मुलासह रहायला आहे. सोमवारी सकाळी तो दुध आणण्यासाठी घराबाहेर गेला होता. परंतु बराच वेळ होवूनही तो परत न आल्याने त्याची पत्नी खालच्या मजल्यावरी सासु सासरयांच्या घरी आली. परंतु दरवाजा ठोकूनही आतुन प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी सासरे यशवंत यांना फोन करुन कळवले. यानुसार ते काही वेळात घरी आले असता, स्वतकडील चावीने त्यांनी दरवाजा उघडला. यावेळी घरात हॉलमध्ये चंद्रकला ह्या रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत पडलेल्या असल्याचे आढळून आले. धारदार शस्त्राने वार करुन त्यांची हत्या करण्यात आलेली होती. सदर घटनेची माहिती मिळताच रबाळे पोलीसांसह गुन्हे शाखा पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या चौकशीत मयत वृध्द महिला चंद्रकला यांचा मुलगा शेखर हा सकाळपासून बेपत्ता असल्याचे समोर आले. यामुळे पोलीसांनी सोसायटीतले सीसीटीव्ही तपासले. त्यामध्ये सकाळी सात वाजण्याच्या सुमारास तो स्वतच्या हातांकडे निरखून पाहत सोसायटीमधून बाहेर जाताना दिसून येत आहे. शिवाय त्याचा मोबाईल फोनही बंद असल्याने संशय व्यक्त होत आहे.
वृद्ध महिलेची हत्या, बेपत्ता मुलावर पोलिसांचा संशय
- Advertisement -