Home ताज्या बातम्या वेश्यागमनासाठी आणलेल्या दोन पीडित युवतींची स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांच्याकडून सुटका

वेश्यागमनासाठी आणलेल्या दोन पीडित युवतींची स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांच्याकडून सुटका

0

परवेज शेख लोणावळा, दि. ५ फेब्रुवारी : लोणावळा परिसरातील उच्चभ्रू वस्तीतील बंगल्यावर धाड टाकून वेश्यागमनासाठी आणलेल्या दोन पीडित युवतींची स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांच्याकडून सुटका करण्यात आली.


SHIFA MOBILE : 9028293338

मा. श्री. संदीप पाटील, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी दिलेल्या
आदेशाप्रमाणे तसेच मा. श्री. पद्माकर घनवट, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे, पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी दि. ०४/०२/२०२० रोजी वलवण गावाच्या हद्दीत, खत्री पार्क सोसायटीत, बंगला नं. २ येथे छापा टाकला असता सदर ठिकाणी सखाराम तुकाराम पाटील, वय ३९, रा. खत्री पार्क सोसायटी, बंगला नं. २,वलवण लोणावळा, पुणे हा सदर बंगल्यात २ महिलांकडून वेश्याव्यवसाय करावीत असताना सापडला. त्याच्याविरुद्ध लोणावळा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी श्री. पद्माकर घनवट, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. मनोजकुमार यादव,पोलीस निरीक्षक, लोणावळा शहर पोलीस स्टेशन, श्री. पृथ्वीराज ताटे, सहा. पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण, श्री. हनुमंत पासलकर, पोलीस हवालदार, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण, रऊफ इनामदार, पोलीस हवालदार, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण, ज्ञानेश्वर क्षीरसागर, पोलीस हवालदार, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण, सुरेखा कोरफड, महिला पोलीस हवालदार, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांनी पार पाडली.