Home गुन्हा वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्यांना अटक

वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्यांना अटक

0

पुणे : परवेज शेख सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा पुणे शहर यांचेकडुन वेश्याव्यवसाय करणा-या महिला व आरोपी अटक दि.१०/१०/२०१९ रोजी मा. सहा. पोलीस आयुक्त विजय चौधरी अभियोग गुन्हे शाखा पुणे शहर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून गिता लॉज, ९ बी, बुधवार पेठ, पुणे ६ येथे इसम नामे १)ज्ञानेश्वर तानाजी सुर्यवंशी वय २८ वर्षे २)बलभिम ऊर्फ बळी अशोक हांडे वय २४ वर्षे, ३)सायबा हजरत अली । ऊर्फ सोनू वय ३३ वर्षे हे मुलींना वेश्याव्यवसायासाठी आणुन त्यांचेकडुन वेश्याव्यवसाय करुन घेत आहे.


सदर बाबत सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे श्री विजय चौधरी व पोलीस निरीक्षक श्रीमती वैशाली चांदगुडे यांचे मार्गदर्शनाखाली तात्काळ बातमीची पडताळणी करुन गिता लॉज, ९ बी, बुधवार पेठ, पुणे ६ येथे २०.४५ वा अचानक छापा टाकुन वरील आरोपी यांनी वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या एकूण ८ पिडित मुलींची सुटका करण्यात आली. सदर प्रकरणी आरोपी नामे १)ज्ञानेश्वर तानाजी सुर्यवंशी वय २८ वर्षे २)बलभिम ऊर्फ बळी अशोक हांडे वय २४ वर्षे, ३)सायबा हजरत अली ऊर्फ सोनू वय ३३ वर्षे यांचे विरुध्द विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे गु.र.नं ३४२/२०१९ अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ कलम ३,४,५,७ सह भादंवि क ३७० प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कारवाई श्री.बच्चनसिंग पो.उप.आयुक्त गुन्हे, यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस आयुक्त श्री विजय चौधरी, पोलीस निरीक्षक श्रीमती वैशाली चांदगुडे व पोलीस उप निरीक्षक श्री.खडके यांचेसह सामाजिक सुरक्षा विभागाकडील म.पो.ना शिंदे, पो.हवा. कुमावत, पो.ना. माने, पो.ना.पठाण म.पो.ना. पुकाळे व पो.शि.खाडे, पो शि संतोष भांडवलकर यांनी केलेली आहे.