वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या दोन महिलांची सुटका

- Advertisement -

पुणे-परवेज शेख
बारामती एमआयडीसीतील एका लॉजिंगवर छापा टाकत तालुका पोलिसांनी वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या दोन महिलांची सुटका केली. याप्रकरणीलॉजिंग व्यवस्थापकासह दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. काल, शुक्रवारी (दि. २) रोजी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली.
पोलिस हवालदार भानुदास बंडगर यांनी याबाबत फिर्याद दाखल दिली. लॉजचा व्यवस्थापक निखिल ज्ञानदेव कनिचे (रा. सूर्यनगरी, बारामती, मूळ रा. तक्रारवाडी, ता. इंदापूर) व केतन विलास मोरे (रा. शेळगाव, ता. इंदापूर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. या दोघाविरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, एमआयडीसीमध्ये महाराष्ट्र बॅंकेशेजारी छापा टाकण्यात आलेले लॉजिंग आहे. याठिकाणी वेश्या व्यवसायासाठी दोन महिलांना आणले होते. याची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी या लॉजिंगवर छापा टाकत या दोन महिलांची सुटका केली. यातील एक महिला शेळगाव येथील तर दुसरी ठाणे जिल्ह्यातील आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी दोन हजाराची रक्कम, एक मोबाईल व अन्य साहित्य असा ११ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

- Advertisement -