Home गुन्हा वेश्या व्यवसाय करणाऱ्या ब्युटी पार्लर वर पोलिसांचा छापा

वेश्या व्यवसाय करणाऱ्या ब्युटी पार्लर वर पोलिसांचा छापा

0

परवेज शेख एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, शनिवारी पश्चिम बंगालमधील आसनसोल दुर्गापूर पोलीस आयुक्तालयाच्या गुप्तचर विभागाच्या पोलिसांनी ब्युटी पार्लरमध्ये छापा टाकला.

या छाप्याचा एक भाग म्हणून बंगाल अंबुजातील एका खासगी ब्युटी पार्लरमध्ये पोलिसांनी सेक्स रॅकेटच्या आरोपाखाली 16 महिला आणि एका पुरुषाला रंगेहाथ पकडले.

गेल्या काही दिवसांपासून पोलिसांना ब्यूटी पार्लरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळत होती. यानंतर आयुक्तालयाच्या गुप्तचर विभागाच्या पोलिसांनी अंबुजा परिसरातील ब्युटी पार्लरमध्ये छापा टाकला.

यासाठी पोलिसांनी सापळा रचला आणि ग्राहक असल्याचे नाटक केले. पोलिसांनी सिव्हील ड्रेसमध्ये ग्राहक म्हणून पार्लरमध्ये पहिले दोन पोलिसांना पाठवले.

साध्या कपड्यातील पोलीस ब्युटी पार्लरमध्ये त्यांच्या कारवायांची माहिती घेण्यासाठी गेले, त्याचवेळी अधिकाऱ्यांना संशय होताच माहिती मिळाली आणि त्यांनी सगळ्यांना तब्यात घेतले.