वैधता संपलेल्या सॅनिटायझरचे वाटप
म. टा. वृत्तसेवा, जव्हारः ग्रामीण भागात करोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले असून, दररोज शेकडो बाधित रुग्णांची नोंद करण्यात येत आहे. मात्र न्ह्याळे खुर्द ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आणि पुरवठादार यांनी वैधता संपलेल्या ५०० मिलीच्या एक हजार सॅनिटायझरचे गावात वाटप केले. स्थानिक व आदिवासी एकता परिषदेचे सदस्य मिलिंद बरफ यांनी हा सर्व प्रकार उघडकीस आणला. दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी लेखी तक्रार तहसीलदार संतोष शिंदे यांच्याकडे केली आहे.
- Advertisement -