Home गुन्हा व्यावसायिकाने स्वत:च्याच हत्येची दिली सुपारी,नैराश्यातून घडलेली सर्वात धक्कादायक घटना

व्यावसायिकाने स्वत:च्याच हत्येची दिली सुपारी,नैराश्यातून घडलेली सर्वात धक्कादायक घटना

नवी दिल्ली : प्रत्येकाला आयुष्यात अनेक संकटाचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत आत्मविश्वासाने आलेल्या सर्व संकटांचा सामना करणे गरजेचे आहे. मात्र हे सहन न झाल्याने अनेक जण नैराश्याचे बळी पडतात.दिल्ली पोलिसांनी नुकताच उपनगरातील बेपत्ता झालेल्या व्यावसायिकाच्या हत्येचा खटला सोडवला आहे. या प्रकरणात एका अल्पवयीन मुलासह चार जणांना अटक करण्यात आली आहे.दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, एका अत्यंत कर्जबाजारी व्यावसायिकाने आपल्या कुटुंबाला विम्याचे पैसे मिळवून देण्यासाठी स्वत: चा जीव घेण्याची सुपारी दिली आणि आरोपींकडून स्वत:ची हत्या घडवून आणली. 10 जून रोजी व्यावसायिकाचा मृतदेह दिल्लीच्या बाहेरील रानहौला भागात एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला.

कर्जबाजारी झालेल्या व्यावसायिकाने स्वत: ची घडवून आणली हत्या

10 जून रोजी आयपी विस्तार क्षेत्रात राहणारी शानू बंसल हिने आनंद विहार पोलीस ठाण्यात तिचा 37 वर्षीय पती गौरव बन्सल बेपत्ता झाल्याची तक्रार केली.  गौरव करकरदूमा येथे किराणा दुकानात काम करत असे. 9 जून रोजी तो दुकानात गेला पण परत घरी आला नाही. व्यवसायात झालेल्या नुकसानीमुळे गौरव नैराश्यात होता.गौरवने फेब्रुवारी 2020 मध्ये 6 लाखांचे वैयक्तिक कर्ज घेतले होते, त्यानंतर गौरवच्या क्रेडिट कार्डातून त्यांच्या माहितीशिवाय 3.50 लाख रुपये काढण्यात आले होते. याबाबत मयूर विहार पोलिसांना माहिती देण्यात आली होती. 10 जून रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास गौरव बन्सलचा मृतदेह दिल्ली शहराच्या बाहेरील रणहौला भागात तलावाजवळ झाडावर लटकलेला आढळला.

एका अल्पवयीन मुलासह चार जणांनी केला खून

जेव्हा पोलिसांचा तपास सुरू झाला तेव्हा बेपत्ता होण्यापूर्वी गौरवने एका मुलाशी फोनवर बोलून आत्महत्या करण्याची सुपारी दिली होती. या नियोजनानुसार गौरवने आपली कार घरातच ठेवली आणि रणहौला परिसरात पोहोचला. जाताना त्याने आपला फोटो व्हॉट्सअ‍ॅपवर आरोपीला पाठविला, जेणेकरुन ते त्याला ओळखू शकतील. गौरव रणहौला पोहोचताच या चार आरोपींनी त्याचे हात बांधले आणि गळ्याला रशी बांधली आणि झाडावर लटकवले. सध्या पोलिसांनी मनोज, सुरज आणि सुमीतसह एका अल्पवयीन मुलाला अटक केली आहे. सध्या त्यांची चौकशी सुरू आहे.