
मुंबई, दि. ७ : आखाती देशातील युद्ध सदृश परिस्थितीमुळे मागील काही दिवस प्रलंबित झालेली विमान सेवा व विमान उड्डाण सुरू झाली आहेत.व्यावसायिक प्रवासी विमान उड्डाणे नियमित सुरू झाल्याने भारतीय नागरिक, पर्यटक व प्रवासी भारतात येण्यासाठी आवश्यकतेनुसार थेट तिकीट आरक्षित करू शकतात, असे परराष्ट्र मंत्रालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे.
आखाती विविध देशात अडकलेल्या प्रवाशांना याबाबत सहाय्य व अधिक माहितीसाठी असल्यास संबंधित देशातील भारतीय दूतावास अथवा भारताच्या परराष्ट्र मंत्रालयास संपर्क साधावा, याबाबत माहिती महाराष्ट्र शासनाच्या राज्य आपत्तकालीन कार्य केंद्राच्या (SEOC)वतीने देण्यात आली आहे.
०००
- Advertisement -


















WhatsApp