Home ताज्या बातम्या व्वा…! अंतराळातून खूपच सुंदर दिसतो आपला महान भारत; नासाने टिपले छायाचित्र

व्वा…! अंतराळातून खूपच सुंदर दिसतो आपला महान भारत; नासाने टिपले छायाचित्र

0

नवी दिल्ली : अंतराळातून आपला महान भारत कसा दिसतो? याचे कुतूहल असेलच. आज काल ड्रोनच्या सहाय्याने एखादी रॅली, सुंदर ठिकाणांचे आकाशातून चित्रीकरण, फोटो काढले जातात. ही दृष्ये विहंगम असतात. मग आपल्या भारत देशाची दृष्ये अंतराळातून किती विलोभनिय असतील नाही का…चला पाहूया. 


दक्षिण भारतातील बेटे आणि समुद्रकिनाऱ्याचे फोटो नासाने प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने प्रसिद्ध केले. यातील एक फोटो दिवसाचा तर दुसरा फोटो रात्रीचा घेतलेला आहे. अंतराळातून नासाचे स्पेस स्टेशन 24 तासात दिवसातून 16 वेळा भारताच्या भूभागावरून जाते. या काळात आपल्या देशाची खूप सुंदर फोटो काढण्यात अंतराळवीर यशस्वी झाले आहेत. रात्रीच्या वेळी आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन (ISS) मधून घेतले गेलेले फोटो एकदम स्पष्ट आहेत. या फोटोतून कोच्ची आणि कोईम्बतूर सारख्या शहरांमध्ये किती बदल झाले आहेत याची माहिती मिळते. याशिवाय फोटोमध्ये शहरांना जोडले जाणारे हायवे आणि त्यांचे दिवेही दिसत आहेत. 
दिवसा घेतलेला फोटो जेमिनी 11 स्पेसक्राफ्टच्या क्रू ने घेतलेला आहे. यामध्ये समुद्र किनारे आणि जमिनीचा पृष्ठभाग दिसतो.