व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांचे शिष्टमंडळासमवेत मुंबईत आगमन

व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांचे शिष्टमंडळासमवेत मुंबईत आगमन
- Advertisement -


मुंबई, दि. ७ : व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांचे शिष्टमंडळासमवेत आज छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे सकाळी १०.३० वाजता आगमन झाले. राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे यावेळी स्वागत केले.


यावेळी मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलिस आयुक्त देवेन भारती, व्हिएतनामचे उच्चस्तरीय अधिकारी, इतर मान्यवर उपस्थित होते. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांनी शिष्टमंडळासमवेत वांद्रे कुर्ला काम्प्लेक्स मुंबई येथील नॅशनल स्टॉक एक्सचेंज येथे प्रयाण केले.


०००



Source link

- Advertisement -