Home गुन्हा व्हॉटस्‌ऍप मेसेजला उत्तर दिले नाही म्हणून सराफाच्या अपहरणाचा प्रयत्न

व्हॉटस्‌ऍप मेसेजला उत्तर दिले नाही म्हणून सराफाच्या अपहरणाचा प्रयत्न

पुणे: व्हॉटस्‌ऍप मेसेजला उत्तर दिले नाही म्हणून एका सराफाच्या अपहरणाचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी चौघांना उत्तमनगर पोलिसांनी अटक केली आहे.
दत्ता सीताराम विटकर ( वय 37, रा.कर्वेनगर), योगेश सरदार टकले( वय 34, रा. बालेवाडी गावठाण), निखील सुदाम मोरे( वय 24,रा. येरवडा), कासीम हुसेन शेख( वय 27, रा.औधगाव) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. याप्रकरणी एका 33 वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे.
फिर्यादी हा दाढी करण्यासाठी शिवणे येथील मेन्स पार्लरबाहेर थांबला होता. यावेळी यातील दत्ता विटकर तेथे गाडीतून आला. गाडीतून खाली उतरल्यावर त्याने फिर्यादीला व्हॉटसऍपवर मेसेज केले, तु उत्तर देत नाही, तु काय लय मोठा झाला काय? असे दरडावले. त्यानंतर याने व त्याच्या इतर साथीदारांनी शिवीगाळ व दमदाटी करत मारहाण केली. तसेच फिर्यादीला गाडीमध्ये जबरदस्तीने पळवून नेण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) एस. डी. डहाळे करत आहेत.
फिर्यादी यांच्या वडिलांचा सराफी व्यवसाय आहे. ते त्यांच्या वडिलांना व्यवसायास मदत करतात. तर आरोपी दत्ता विटकर हा फिर्यादीच्या ओळखीचा आहे. फिर्यादी त्याच्या कारवर बाहेरगावी जाताना दत्ताला चालक म्हणून नेत असे. चालक म्हणून केलेल्या कामाच्या पैसे देण्या-घेण्याच्या व्यवहारातून दत्ताच्या डोक्‍यात राग होता. दत्ताने यासंदर्भात फिर्यादीला मेसेज व्हॉटस अप ही केला होता. मात्र फिर्यादीने त्याला प्रतिसाद दिला नाही. दरम्यान घटनेच्या दिवशी दत्ता त्याच्या साथीदारांसह खडकवासला धरण परिसरात मद्य पिण्यास गेला होता. तेथून परतताना त्यांनी फिर्यादी सलूनच्या जवळ उभा असलेला दिसला. यानंतर त्यांनी त्याच्यावर हल्ला केला