Home शहरे जळगाव ‘व.वा.’च्या ‘हास्य धारा’त रसिक झाले लोटपोट

‘व.वा.’च्या ‘हास्य धारा’त रसिक झाले लोटपोट

जळगाव : ‘हवा येते हवा जाते.. बदलतात रंग़.. काँग्रेस होती नोकीया आणि भाजपा सॅमसंग’..या विडंबन काव्यासह वात्रटीकाकार रामदास फुटाणे यांच्या विनोदी कवितांनी रसिक लोटपोट झाले आणि ज्येष्ठ कवींच्या मार्मिक कवितांनी जगण्याचा संदेशही दिला.
व़ व़ा़ जिल्हा वाचनालयाच्या १४२ व्या वर्धापनदिनानिमित्त रविवारी सायंकाळी कांताई सभागृहात ‘हास्यधारा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात रामदास फुटाणे यांच्यासह कवी अनिल दीक्षित, नितीन देशमुख भरत दौंडकर, साहेबराव ठाणगे, नारायण पुरी यांची प्रमुख उपस्थिती होती़ फुटाणे यांच्या सुरेख सूत्रसंचालनाने सर्व रसिकांना खिळवून ठेवले तर कवी नितीन देशमूख यांच्या अंगावर शहारे आणणाऱ्या कवितेने या संमेलनाचा समारोप झाला़ व़ वा़ वाचनालय हे केवळ वाचनालय राहिलेले नसून ती एक सांस्कृतिक चळवळ बनली असल्याचे अ‍ॅड़ सुशील अत्रे यांनी प्रास्ताविकात सांगितले.
हत्येच्या घटनेवर व्यक्त केली चिंता
महाविद्यालयात दुचाकी कट लागल्याच्या कारणावरून एका तरूणाचा जीव जात असेल तर माणसाचे पशुत्व वाढत चालले आहे व जनावर आपल्या कामाला येताय, अशी खंत फुटाणे यांनी व्यक्त केली़ सर्व प्रश्न आर्थिक आहेत, सर्व जातींना जरी आरक्षण दिले तरी नोकरीचे प्रश्न सुटणार नाही़ पुस्तकांवर नव्या पिढीने प्रेम करावे, ही जबाबदारी जेवढी वाचनालयांची तेवढीच ती पालकांची आहे, मात्र पालक स्वत:च मोबाईलवर असतात़ फाईव्ह जीच्या या जमान्यात विकासाला मात्र रेंज नसल्याचे फुटाणे म्हणाले़ इंडिया झपाट्याने पुढे चालला आहे मात्र, भारत सरपटत आपले अस्तित्व शोधतोय़ खडसे खडसे आहे, महाजन महाजन आहेत. त्यामुळे चिंतेत राहू नका, असे ते म्हणाले.
कवितांनी मिळविल्या टाळ्या
‘जळणाºयाला विस्तव कळतो…बघणाºयाला नाही, जगणाºयाला जीवन कळते… पळणाºयाला नाही’ ही मार्मिक कविता चांदूरबाजाराचे नितीन देशमुख यांनी सादर करून दाद मिळविली़ अनिल दीक्षित यांनी नोटाबंदीवर झिंगाटच्या चालीवर कविता सादर केली़ भरत दौंडकर यांनी जमीनीच्या गुंठेवारीवर कविता सादर केली़ नारायण पुरी यांनी प्रेमाचा जांगडगुत्ता ही विनोदी कविता सादर केली. साहेबराव ठाणगे यांनी ग्रामीण वास्तव मांडले.