उस्मानाबाद । जिल्हा प्रतिनिधी । २९ मे : जिल्हा प्रशासनाने शनिवारी ३० व रविवारी ३१ मे रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात “जनता कर्फ्यू”चा आदेश जारी केला आहे. याकाळात नागरिकांनी घरात राहूनच प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी केले.
या दरम्यान रुग्णालये, औषधी दुकाने व दूध विक्रीची दुकाने चालू राहणार आहेत. अत्यावश्यक सेवासाठी फक्त पेट्रोल पंपावर पेट्रोल उपलब्ध होईल. अन्य सर्व अस्थापना बंद असतील. असे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील कोणत्याही नागरिकांनी कोणत्याही कारणासाठी घराबाहेर पडू नये. घरातच राहावे. प्रशासन आपल्या सेवेसाठी घराबाहेर थांबले आहे. प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन घरातच बसून राहिल्यास कोरोना विषाणूचा संसर्ग होणार नाही. नागरिकांनी अधिक जागरुक राहत प्रशासन राबवत असलेल्या उपाय योजनांना सकारात्मक प्रतिसाद द्यावा. घरामध्येच कुटुंबियासह थांबण्याचे आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी केले.