Home ताज्या बातम्या शरद पवारांच्या मनात काय? राष्ट्रवादीची आज महत्त्वाची बैठक

शरद पवारांच्या मनात काय? राष्ट्रवादीची आज महत्त्वाची बैठक

0
शरद पवारांच्या मनात काय? राष्ट्रवादीची आज महत्त्वाची बैठक

हायलाइट्स:

  • राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व मंत्र्यांची आज बैठक
  • पक्षाध्यक्ष शरद पवार मार्गदर्शन करणार
  • राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा होण्याची शक्यता

मुंबई: मराठा, ओबीसी व धनगर आरक्षणावरून राज्यात सध्या वातावरण तापलं असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षाचे नेते व मंत्र्यांची महत्त्वाची बैठक आज होत आहे. या बैठकीत नेमकी काय चर्चा होणार व शरद पवार हे नेत्यांना काय मार्गदर्शन करणार, याविषयी तर्कवितर्क लावले जात आहेत. (Sharad Pawar Meeting With NCP Legislators and Leaders)

वाचा: …आणि शिवसैनिक लाठ्याकाठ्या घेऊन स्मशानभूमीत पोहोचले!

पित्ताशयावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर शरद पवार हे गेले काही दिवस दैनंदिन राजकीय घडामोडींपासून दूर होते. आता त्यांची प्रकृती उत्तम असून ते पुन्हा एकदा पक्षाच्या कामात सक्रिय झाले आहेत. त्याच वेळी राज्यात वेगवेगळे प्रश्न ऐरणीवर आले आहेत. पदोन्नतीतील आरक्षण, लॉकडाऊन, निधी वाटप अशा मुद्द्यांवरून महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये कुरबुरी आहेत. तर, आरक्षणावरून विरोधकांनी सरकारला घेरलं आहे. करोनाचं संकटही राज्यावर अद्याप कायम आहे. लॉकडाऊनचा (Lockdown) फटका बसत असल्यामुळं लोकांच्या मनातही अस्वस्थता आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे. राज्यातील मराठा समाजाला आर्थिक दुर्बल घटकातून आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मात्र, आरक्षणाबाबतची पुढील लढाई सुरूच राहणार आहे. त्यामुळं या मुद्द्यावर सरकारची रणनीती काय असावी, याबाबतही पक्षात मंथन होण्याची शक्यता आहे.

नवाब मलिक म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आजच्या बैठकीबाबत माहिती दिली. ते म्हणाले, ‘पवारसाहेब हे पक्षाचे प्रमुख नेते व मंत्र्यांची बैठक वरचेवर घेत असतात. त्यातून पक्षाच्या व मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेतला जातो. त्यासाठीच ही बैठक आहे. जिल्ह्याजिल्ह्यातील राजकीय परिस्थिती, कोविड व अन्य प्रश्नांची माहिती पवारसाहेब घेतील. त्यानंतर ते सर्वांना मार्गदर्शन करतील.’
वाचा: मुंबई महापालिकेची निवडणूक होणार; राज्य निवडणूक आयोगाने दिले ‘हे’ आदेश

Source link