शहरात विनाकारण व मॉर्निंग वॉकला निघालेल्या १९० जणांना पोलिसांची कारवाई व्यायामाचे धडे देवून करवून घेतली कसरत, समज देवून सोडले
बुलडाणा / खामगाव – कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशासह राज्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र नागरीक विनाकारण घराबाहेर फिरताना दिसून येत आहेत. लॉकडाऊन लागू असताना सकाळी विनाकारण बाहेर फिरणारया व मॉर्निंग वॉकला निघालेल्या १९० जणांना पोलिसांनी ताब्यात घेवून व्यायामाचे धडे दिली. या सर्वांना सोशल डिस्टन्सिंग पाळत येथ्ील शहर पोलिस स्टेशन समोर बसवून त्यांच्याकडून कसरत करुवन घेतली. त्यानंतर त्यांना समज देवून सोडून देण्यात आले.
- Advertisement -