शाळेत असताना ‘असा’ दिसायचा शाहरुख, व्हायरल होताय किंग खानचा जुना फोटो

शाळेत असताना ‘असा’ दिसायचा शाहरुख, व्हायरल होताय किंग खानचा जुना फोटो
- Advertisement -


हायलाइट्स:

  • अभिनेता शाहरुख खान सोशल मीडियावर नेहमीच असतो चर्चेत
  • शाहरुख खानचा एक जुना फोटो सध्या सोशल मीडियावर होतोय व्हायरल
  • लवकरच शाहरुख खान ‘पठाण’ चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. फक्त देशातच नाही तर परदेशातही शाहरुखचा बराच मोठा चाहता वर्ग आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो अनेकदा आपल्या चाहत्यांशी संवाद साधताना दिसतो. अनेकदा तो त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेतही असतो. आताही तो एका व्हायरल फोटोमुळे चर्चेत आला आहे. सध्या सोशल मीडियावर शाहरुख खानचा शाळेच्या दिवसातील एक फोटो व्हायरल होताना दिसत आहे. ज्यावर चाहत्यांच्या कमेंटचा पाऊस पडताना दिसत आहे.

बॉबी नावाच्या एका युझरनं शाहरुख खानचा एका जुना फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. ज्यात शाहरुख खान त्याच्या शाळेतील मित्रांसोबत दिसत आहे. या फोटोमध्ये एकीकडे शाहरुखचे मित्र हसताना दिसत आहेत. तर दुसरीकडे शाहरुखच्या चेहऱ्यावर मात्र खूपच गंभीर भाव आहेत. युझरनं शेअर केलेल्या या फोटोवर शाहरुखचे चाहते सातत्यानं कमेंट करताना दिसत आहेत.

अलिकडच्याच काळात शाहरुख खान सोशल मीडियावर एका वेगळ्याच कारणानं चर्चेत आला होता. भारतीय क्रिकेटपटू दिनेशनं एका मुलाखतीत शाहरुख खानबद्दल एका खुलासा केला होता ज्यामुळे सोशल मीडियावर शाहरुखच्या नावाची चर्चा झाली होती. दिनेश कार्तिकनं गौरव कपूरचा शो पोस्टकार्डमध्ये खुलासा केला होता की, ‘जेव्हा मी एकदा कठीण परिस्थितीत होता तेव्हा शाहरुखनं त्याच्यासाठी खासगी विमानाची सोय केली होती.’

शाहरुख खानच्या कामाबद्दल बोलायचं तर बऱ्याच मोठ्या ब्रेकनंतर शाहरुख पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर कमबॅक करत आहे. ‘पठाण‘ हा त्याचा बहुचर्चित चित्रपट आगामी काळात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांच्या या चित्रपटात जॉन अब्राहम आणि दीपिका पादुकोण यांच्याही महत्तवपूर्ण भूमिका आहेत. शाहरुख खान शेवटचा २०१८ मध्ये रिलीज झालेल्या ‘झीरो’ चित्रपटात दिसला होता.



Source link

- Advertisement -