शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा जिल्ह्यात लोककलांद्वारे जागर सुरू – महासंवाद

शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा जिल्ह्यात लोककलांद्वारे जागर सुरू – महासंवाद
- Advertisement -

सांगली, दि. 9, (जि. मा. का.) : ‍महाविकास आघाडी शासनाला दोन वर्षे पूर्ण झाली. या दोन वर्षात कोरोना सारख्या महामारीला तोंड देत राज्य शासनाने अनेक लोककल्याणकारी निर्णय घेतले. या लोककल्याणकारी निर्णयांचा लोककलाकारांच्या माध्यमातून आज जागर सुरू झाला. सांगली चे प्रसिध्द शाहीर बजरंग आंबी, देवानंद माळी, रामचंद्र नायकू जाधव यांनी आपल्या विविध कलांव्दारे जिल्ह्यातील विविध गावांमध्ये जागर केला. यास जनतेनेही भरभरून प्रतिसाद दिला.

शाहीर बजरंग आंबी यांनी पलूस तालुक्यातील कुंडल, रामानंदनगर व किर्लोस्करवाडी येथे, शाहीर देवानंद माळी यांनी मिरज तालुक्यातील नांद्रे, दुधगाव व सांगली येथे तर शाहीर रामचंद्र नायकू जाधव यांनी जत तालुक्यातील शेगाव, डफळापूर व जत येथे आपल्या बहारदार कार्यक्रमांव्दारे शासनाच्या योजनांची प्रसिध्दी केली.

जिल्ह्यात दि. 10 मार्च रोजी शाहीर बजरंग आंबी पलूस तालुक्यात सकाळी बांबवडे, दुपारी भिलवडी व  सायंकाळी अंकलखोप येथे, शाहीर देवानंद माळी वाळवा तालुक्यात सकाळी आष्‍टा दुपारी इस्‍लामपूर व सायंकाळी वाळवा येथे तर शाहीर रामचंद्र नायकू जाधव जत तालुक्यात सकाळी माडग्‌याळ, दुपारी गुड्डापूर  व सायंकाळी संख येथे आपल्या पथकाव्दांरे कार्यक्रम सादर करणार आहेत. याचा जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

000000

- Advertisement -