Home मनोरंजन शाहरुख की सलमान? उत्तर देत विद्या बालनने केली युझरची बोलती बंद

शाहरुख की सलमान? उत्तर देत विद्या बालनने केली युझरची बोलती बंद

0
शाहरुख की सलमान?  उत्तर देत विद्या बालनने केली युझरची बोलती बंद

[ad_1]

हायलाइट्स:

  • लाइव्ह सेशनमध्ये युझरने विचारला प्रश्न
  • उत्तर देत विद्याने केली युझरची बोलती बंद
  • विद्याच्या ‘शेरनीसाठी चाहते उत्सुक

मुंबई– बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन चित्रपटसृष्टीतील टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. विद्याने आपल्या हटके अंदाजाने आणि उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांना भूरळ पाडली आहे. अनेक हिट चित्रपट देऊन विद्याने चित्रपटसृष्टीमध्ये तिची वेगळी ओळख निर्माण केली. चाहते विद्याच्या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहात असतात. विद्याच्या आगामी ‘शेरनी’ चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला होता. चित्रपटाच्या टीझरला मिळालेल्या प्रतिसादावरून प्रेक्षकांमधील चित्रपटासाठीची उत्सुकता दिसून येते. विद्या अभिनयासोबतच तिच्या स्पष्टवक्तेपणासाठीही प्रसिद्ध आहे. पुन्हा एकदा अभिनेत्रीने युझरने विचारलेल्या प्रश्नावर विद्याच्या स्टाइलने उत्तर देत चाहत्यांची मनं जिंकून घेतली आहेत.

हिंदी मालिकेत काम करण्याचा अनुभव कसा आहे? मयुरी देशमुख म्हणते….

विद्याने इन्स्टाग्रामवर चाहत्यांसाठी लाइव्ह सेशन आयोजित केलं होतं. या सेशनमध्ये युझर्स विद्याला प्रश्न विचारू शकत होते. एका युझरने विद्याला तिचा आवडता अभिनेता कोण असं विचारलं आणि सलमान की एसआरके असे पर्याय दिले. त्यावर विद्या स्टाइलने उत्तर देत अभिनेत्रीने माय एसआरके लिहत आपल्या पतीसोबतचा फोटो शेअर केला आणि सोबत एक लाल हार्टवाला इमोजीदेखील लिहिला. विद्याच्या या उत्तराचा अर्थ अनेक चाहत्यांना कळाला नाही. परंतु, विद्याच्या या उत्तराचा रोख तिच्या पतीकडे होता.

AssignmentImage-1504984278-1623158996

विद्याने आपल्या पतीसाठी प्रेम व्यक्त करत एसआरके लिहिलं. या एसआरकेचा अर्थ सिद्धार्थ रॉय कपूर असा होतो. विद्याने पतीला हिरो बनवत तोच तिचा आवडता अभिनेता असल्याचं म्हटलं. एका दुसऱ्या युझरने विद्याच्या रिलेशनशिपचं स्टेटस विचारत लिहिलं, ‘तुम्ही कमिटेड आहात का?’ त्यावर पुन्हा एकदा आपल्या पतीसोबतचा सुंदर फोटो शेअर करत विद्याने लिहिलं, ‘मला तरी तसंच वाटतंय.’ विद्याच्या ‘शेरनीची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात येत आहे.

कोण खरं कोण खोट? रियाच्या आरोपांवर नितीश भारद्वाज यांचा खुलासा; म्हणाले सुशांत आणि साराला कधीही…

[ad_2]

Source link