शाहरुख खानला स्वतःचा आदर्श मानायचा सुशांत; म्हणाला होता, ‘त्यांनी माझे सर्व गैरसमज…’

शाहरुख खानला स्वतःचा आदर्श मानायचा सुशांत; म्हणाला होता, ‘त्यांनी माझे सर्व गैरसमज…’
- Advertisement -


हायलाइट्स:

  • दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची आज पहिली पुण्यतिथी
  • बॉलिवूड किंग शाहरुख खानला आदर्श मानत असे सुशांत
  • सुशांतनं २०१३ साली ‘काय पो छे’ या चित्रपटातून केलं होतं बॉलिवूड पदार्पण

मुंबई: बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची आज पहिली पुण्यतिथी. मागच्या वर्षी सुशांतनं मुंबईतील राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली होती आणि या घटनेनं संपूर्ण देश हादरला होता. सुशांतनं त्याच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात टीव्हीपासून केली होती आणि फार कमी कालावधीतचं त्यानं बॉलिवूडमध्येही आपला जम बसवला होता. पण अभिनयासाठी सुशांत नेहमीच अभिनेता शाहरुख खानला आपला आदर्श मानत असे.

‘त्या’ युरोप टूरमध्ये नेमकं काय घडलं? ज्यानंतर बदलत गेलं होतं सुशांतचं वागणं
सुशांतनं २०१७ मध्ये एका हिंदी वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत आपल्या आयुष्यावर शाहरुख खानचा किती प्रभाव आहे हे सांगितलं होतं. सुशांत शाहरुख खानचा खूप मोठा चाहता होता. ही गोष्ट त्यानं अनेकदा बोलूनही दाखवली होती. शाहरुखच्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या चित्रपटानं सुशांतला प्रेरित केलं होतं असं सुशांत नेहमी सांगायचा. सुशांत म्हणाला होता, ‘शाहरुख खाननी माझे सर्व गैरसमज दूर केलेत. त्यांना पाहिल्यावर मला समजलं की मला कोण व्हायचंय.’

सुशांत पुढे म्हणाला होता, ‘ही ९० च्या दशकाच्या सुरुवातीची गोष्ट आहे. जेव्हा इकॉनमी सर्वांसाठी खुली करण्यात आली होती. आम्ही कोकच्या बाटल्या पहिल्यांदा पाहत होतो. वेगवेगळे परदेशी ब्रॅन्ड भारतात येत होते. त्यावेळी समजत नव्हतं की, भारतीय संस्कृतीचं आचरण करावं की पाश्चिमात्य संस्कृती स्विकारावी. त्याचवेळी शाहरुखचा ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ रिलीज झाला. मी त्यावेळी ५ व्या इयत्तेत होतो आणि राजच्या भूमिकेनं बियर पिणं किती कूल आहे हे लोकांना दाखवलं होतं पण यासोबतच तो सिमरनशी लग्न करण्याआधी तिच्या वडिलांनी परवानगी देण्याची वाट पाहतो. हे एक संतुलन होतं. आगामी भारतासाठी आदर्श लग्न आणि आपली संस्कृती वाचवण्याचा तो प्रयत्न करत होता.’

सुपरस्टार झाल्यानंतर १७ वर्षांनी जेव्हा पटनाला गेला होता सुशांत, आईची पूर्ण केलेली इच्छा
सुशांतसिंह राजपूतसाठी नेहमीच शाहरुख खान त्याचं प्रेरणास्थान होतं. शाहरुखनंहील त्याच्या करिअरची सुरुवात टीव्हीपासून केली होती आणि कमी काळातच बॉलिवूडमध्ये प्रसिद्धी मिळवली होती. सुशांत म्हणला होता, ‘शाहरुखला पाहिल्यानंतर मला जाणीव झाली की, टीव्हीपासून सुरुवात करूनही तुम्ही चित्रपटांमध्ये यश मिळवू शकता. सुशांतनं २०१३ साली ‘काय पो छे’ या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्यानं ‘शुद्ध देसी रोमांस’, ‘पीके’, ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’, ‘केदारनाथ’, ‘छिछोरे’ आणि ‘दिल बेचारा’ यासारखे उत्तम चित्रपट दिले.’



Source link

- Advertisement -