Home ताज्या बातम्या शिक्षणातील आमुलाग्र बदलांबाबत सविस्तर चर्चा

शिक्षणातील आमुलाग्र बदलांबाबत सविस्तर चर्चा

0

पुणे : परवेज शेख दिल्ली येथे दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि शालेय शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांच्याकडून दिल्ली सरकारमार्फत राबवण्यात येणाऱ्या शिक्षणातील आमुलाग्र बदलांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. नियोजित भेट हि सुमारे दहा ते पंधरा मिनिटांची ठरलेली असताना देखील त्यांनी तब्बल तासभर वेळ काढत सविस्तर चर्चा केली.

सर्वसामान्यांच्या हितासाठी काम करत असताना त्यामध्ये कोणतही राजकारण न करता गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत व त्या अंमलात आणल्या पाहिजेत, अस मला वाटतं.

दिल्ली शासनाकडून शिक्षणात होणारा तंत्रज्ञानाचा वापर, वर्गप्रतिनिधी, पालकप्रतिनिधी ठरवण्याबाबत राबवले जाणारे उपक्रम, शिक्षकांच्या सक्षमीकरणासाठी राबवण्यात येणारे उपक्रम,सरकारी शाळांना खाजगी शाळांहून अधिक सक्षम करण्यात निभावलेली भूमिका हे सर्व प्रत्यक्ष शाळांना भेटी देवून आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासोबतच्या चर्चा करून समजून घेता आलं.

शिक्षणव्यवस्थे सोबतच आरोग्यविषयक राबविण्यात येणाऱ्या मोहल्ला क्लिनिकला देखील भेट देण्यात आली. गल्लीच्या पातळ्यांवर सरकारी हॉस्पीटलचे केलेले विकेंद्रिकरण नक्कीच नविन प्रयोग म्हणून विचार करायला लावणारी गोष्ट आहे.

अक्षय मराठे हा सर्वसामान्य घरातला मुंबईचा मुलगा दिवसभर मला दिल्ली शासनामार्फत झालेले बदल समजावून सांगत होता. २०१३ साली तो मुंबईतून दिल्लीत आला व आप सोबती रचनात्मक कामांमध्ये गुंतला आहे.