Home ताज्या बातम्या शिरूरमधल्या घोडगंगा सहकारी साखर कारखान्याला भीषण आग

शिरूरमधल्या घोडगंगा सहकारी साखर कारखान्याला भीषण आग

0

शिरूरमधल्या घोडगंगा सहकारी साखर कारखान्याला भीषण आग

पुणे जिल्ह्यातल्या शिरूरमधल्या घोडगंगा सहकारी साखर कारखान्याला भीषण आग लागली आहे. आगीचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

दुपारी 12. 30 च्या सुमारास घोडगंगा साखर कारखान्याला आग लागली. यावेळी धुराचे उंचच उंच आणि मोठे आणि लोळ पहायला मिळत आहेत.

घटनास्थळी अग्नीशमन दलाच्या 3 गाड्या दाखल झाल्या आहेच. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्नीशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाल्याचा अंदाज आहे.