पुणे:प्रतिनिधी संतोष सावंत शिरूर लोकसभा मतदार संघातुन शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या डॉ. अमोल कोल्हे यांचा दणदणीत विजय झाला तर शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव झाला. हा पराभव सेनेला चांगलाच जिव्हारी लागला आहे. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान पक्ष विरोधी काम करणार्या पदाधिकार्यांवर आता शिवसेनेने कारवाई सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुणे जिल्हा परिषदेतील गटनेत्या आणि सन 2002 पासुन जि.प. सदस्य असणार्या आशा बुचके यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.
- Advertisement -