शिल्पा शेट्टीला राज कुंद्राशी करायचं नव्हतं लग्न, पण बिग बींच्या समोरचं घर घेऊन केलं इम्प्रेस

शिल्पा शेट्टीला राज कुंद्राशी करायचं नव्हतं लग्न, पण बिग बींच्या समोरचं घर घेऊन केलं इम्प्रेस
- Advertisement -


हायलाइट्स:

  • राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्या नात्यात लग्नाआधीच आला होता दुरावा
  • प्रेम करत असतानाही शिल्पानं राजशी लग्न करण्यास दिला होता नकार
  • शिल्पा शेट्टीला लग्नाबाबत सतावत होती मोठी चिंता

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रा याला पॉर्न फिल्म्सची निर्मिती आणि वेगवेगळ्या अॅप्स आणि वेबसाइटवर प्रसारित करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. ज्यामुळे सध्या अभिनेत्री शिल्पा शेट्टी देखील अडचणीत आली आहे. काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी शिल्पा शेट्टीचीही या प्रकरणात कसून चौकशी केली. राज कुंद्राच्या चुकांचा परिणाम आता शिल्पाच्याही करिअरवर होणार आहे. पण शिल्पा आणि राजमध्ये भांडण होण्याची ही पहिलीच वेळ नाही हे ऐकल्यावर अनेकांना धक्का बसेल.

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रानं २२ डिसेंबर २००९ रोजी लग्न केलं होतं. ही बॉलिवूडमधील अशी जोडी आहे. ज्यांच्या भांडणाचं वृत्त प्रसारमाध्यमांपर्यंत कधीच पोहोचलं नाही. सोशल मीडियावर या दोघांमध्ये फक्त प्रेमच दिसून आलं. दोघंही एकमेकांच्या पोस्टवर कमेंट करताना दिसतात. शिल्पानं राजला आपला लाइफ पार्टनर म्हणून निवडलं असलं तरीही एक वेळ अशीही होती की, तिला राज कुंद्राशी लग्न करायचंच नव्हतं. या दोघांच्या नात्यात एवढा दुरावा आला होता की, लग्नाआधीच त्यांचं नातं तुटण्याच्या मार्गावर होतं.

Raj Kundra Porn Case: राज कुंद्रानं ठेवलं होतं टार्गेट, २०२३ पर्यंत कमवायचे होते ३४ कोटी रुपये!

शिल्पा शेट्टीनं वयाच्या १७ व्या वर्षी तिच्या करिअरची सुरुवात केली होती. शिल्पानं २००९ साली राज कुंद्राशी लग्न केलं. पण त्याआधी तिला एक वेगळीच चिंता सतावत होती आणि तिनं राजशी लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. याचा खुलासा शिल्पानं स्वतःच एका मुलाखतीत केला होता. ती म्हणाली होती, ‘जेव्हा मी १७ वर्षांची होते तेव्हापासून काम करायला सुरुवात केली होती. करिअरमध्ये यश मिळाल्यानंतर मी वयाच्या ३२ व्या वर्षी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण यावर मी ठाम नव्हते. मला आई व्हायचं होतं. जो लग्नानंतर सर्वात महत्त्वाचा भाग असतो. पण मला वाटायचं की, एक पत्नी, आई आणि सून झाल्यावर माझं करिअर मात्र मागे राहिल. मला माझ्या नवऱ्यावर अवलंबून राहून जीवन जगायचं नव्हतं.’

शिल्पा शेट्टी पुढे म्हणाली, ‘त्यावेळी मला राज कुंद्रानं स्पष्ट शब्दात सांगितलं की, एक तर तिने त्याच्याशी लग्न करावं नाही तर मग हे नातं संपवून टाकावं. अर्थात मी अगदी योग्य निर्णय घेतला आणि राजशी लग्न केल्यानंतरही माझ्या करिअरवर काहीच फरक पडला नाही. पण लग्न झालं तेव्हा मात्र तिला तिच्या करिअरची चिंता सातत्यानं सतावत होती. ज्यामुळे शिल्पा आणि राजमध्ये अनेकदा वाद झाले आहेत.’

Pornography Case: ‘तू कुटुंबाची बदनामी केलीस…’ राजला समोर पाहिल्यावर शिल्पाची संतप्त प्रतिक्रिया

करिअर व्यतिरिक्त शिल्पा आणि राजच्या नात्यात दुरावा येण्याचं हे एकच कारण नव्हतं. या व्यतिरिक्त शिल्पाला भारत सोडून परदेशात शिफ्ट व्हायचं नव्हतं. एका मुलाखतीत राज कुंद्रानं सांगितलं होतं, ‘मी शिल्पाला आमच्या नात्याला एक संधी देण्यास सांगितलं होत. पण तिचं म्हणणं होतं की, हे काम नाही करणार तिने मुंबई सोडण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. मी त्यावेळी लंडनमध्ये राहत होतो.’ राज कुंद्रावर प्रेम असूनही शिल्पा या लग्नासाठी तयार नव्हती. त्यामुळे मग राज कुंद्रानं वाशु भागनानी यांना फोन केला आणि आपल्याला मुंबईमध्ये घर विकत घ्यायचं आहे असं सांगितलं. राज कुंद्रानं त्यावेळी काहीच न पाहता ते घर विकत घेतलं आणि शिल्पाला फोन करून सांगितलं, ‘तुला मुंबईमध्ये राहायचं होतं ना मी मिस्टर बच्चन यांच्या घरासमोर एक घर घेतलं आहे.’



Source link

- Advertisement -