Home गुन्हा शिवडीत तरुणाची हत्या

शिवडीत तरुणाची हत्या

0

प्रतिनिधी : शफीक शेख

मुंबई : पूर्वाश्रमीचा राग मनात धरून गणेश पोळ (वय २९) रा. शिवडी याची गोळ्या झाडून आणि तीक्ष्ण हत्याराने घाव घालून हत्या करण्यात आली. हि घटना मंगळवार पहाटे ३ वाजता शिवडी पूर्व येथील कोलगेट कंपनीजवळ घडली. या हत्येतील प्रमुख आरोपी सुशांत साळुंखे उर्फ काला कट्टा आणि त्याच्या साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे.