Home गुन्हा शिवनेरी बसमध्ये चढून प्रवाशांची लॅपटॉपसह बॅग लांबवणारा अटक

शिवनेरी बसमध्ये चढून प्रवाशांची लॅपटॉपसह बॅग लांबवणारा अटक

0

पुणे परवेज शेख , दि. १९ नोहेंबर (प्रतिनिधी): प्रवासी म्हणून शिवनेरी बसमध्ये चढून प्रवाशांची लॅपटॉपसह बॅग लांबवणारा व सदर लॅपटॉप खरेदी करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी अटक केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्वारगेट पोलिस ठाण्याचे पोलिस स्वारगेट
एस.टी. स्टँड वर सी.सी.टी.व्ही. फुटेज पाहून स्वारगेट एस.टी.स्टॅन्ड
प्रवाशानकडून माहिती घेत असताना सदर इसम दिलीप टिकोले (वय ३१, रा. नेरले, ता. करमाळा, जि. सोलापूर) सारखा दिसतो. यावरून पोलिसानी २ पथके करून सदर आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने स्वारगेट, शिवाजीनगर व पुणे स्टेशन एस. टी. स्टँड प्रवाशाची बॅग पाहून त्याचेसोबत चढून लॅपटॉप असणाऱ्या प्रवाशी सीटजवळ उभा राहून लॅपटॉप बॅगेजवळ स्वत:ची बॅग ठेवून गाडी सुटणेचे वेळी लॅपटॉपची बॅग घेवून ती समाधान भोसले (वय ३१, रा. सदर) यास विकण्यासाठी देत असे. त्याच्याकडून एकूण ४,४०,०००/- चे १९ लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत.

पोलिस उपनिरीक्षक जायभाय पुढील तपास करीत आहेत. सदर
आरोपीवर ईतवारा, मनमाड व करमाळा असे तीन पोलिस स्टेशनात गुन्हे दाखल आहेत.

सदर कामगिरी पश्चिम प्रादेशिक विभागचे अपर पोलिस आयुक्त श्रीकांत तरवडे, परिमंडळ -२ चे पोलिस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, स्वारगेट विभागचे सहायक पोलिस आयुक्त सर्जेराव बाबर, स्वारगेटचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवडी, गुन्हेचे पोलिस निरीक्षक शब्बीर सय्यद, यांचे सुचनांप्रमाणे व मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी सुरेश जायभाय, संजय आदलिंग,हवालदार शेख, गभाले, कदम, पो. नाईक कुंभार, पोलीस कर्मचारी कांबळे, दळवी,साळवे, बडे, सरक, भोकरे यांनी केली आहे.