परवेज शेख शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज कृषी विज्ञान केंद्राच्या ‘कृषिक’ या शेतीविषयक प्रदर्शनप्रसंगी मनोगत व्यक्त केले.
यावेळी त्यांनी खालील मुद्दे मांडले:
-हे प्रदर्शन नुसते प्रदर्शन नाही आहे, प्रात्यक्षिकांसह हे प्रदर्शन आहे. ही गोष्ट अशी केली की काय होतं याच प्रात्यक्षिक इकडे दाखवणारं कदाचित देशातलं एकमेव प्रदर्शन असेल.
-आपला देश हा कृषिप्रधान देश आहे आणि कृषिप्रधान देश म्हटल्यानंतर शेतीसमोर संकट किंवा आव्हान आलं तर हातपाय गाळून नाही चालणार. माझ्या शेतीमध्ये नवे तंत्रज्ञान येत असतील तर तर ते का नाही स्वीकारावे?
-दर्जेदार उत्पन्न जर का आपण इतर वस्तूंमध्ये करत असू तर माझ्या कृषिप्रधान देशामध्ये अन्नधान्याच्या बाबतीत का नाही करायचं?
-शेतीसाठी जे काही करणे गरजेचे आहे ते हे सरकार केल्याशिवाय राहणार नाही आणि करायचंच हे ठरवूनच मी हे करतोय.
-शेतकऱ्याला स्वतःच्या पायावर उभं केलंच पाहिजे आणि हे करणे सरकारचे काम आहे आणि सरकार म्हणून आम्ही त्याला प्राधान्य दिल्याशिवाय राहणार नाही.
-माझा संपूर्ण महाराष्ट्र, माझा संपूर्ण देश सुजलाम् सुफलाम् करून दाखविण्याची हिंमत जी आपल्यामध्ये आहे ती हिंमत दाखविण्याची आता गरज आहे. @ Baramati