Home ताज्या बातम्या शिवसेना @ ५५; शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे शिवसैनिकांसोबत आज काय बोलणार?

शिवसेना @ ५५; शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे शिवसैनिकांसोबत आज काय बोलणार?

0
शिवसेना @ ५५; शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे शिवसैनिकांसोबत आज काय बोलणार?

हायलाइट्स:

  • शिवसेनेचा आज ५५वा वर्धापन दिन
  • उद्धव ठाकरे साधणार शिवसैनिकांसोबत संवाद
  • शिवसैनिकांना काय मार्गदर्शन करणार?

मुंबईः गेल्या पाच दशकांपासून राज्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शिवसेनेचा आज ५५ वा वर्धापन दिन आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळल्यानंतर शिवसेनेचा हा दुसराच वर्धापन दिन असून आज या दिनाचं औचित्य साधून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसैनिकांसोबत समाज माध्यमांद्वारे संवाद साधणार आहेत.

करोनाच्या संकटामुळं मागील वर्षीच्या वर्धापनदिनाचा सोहळा ऑनलाइन घेण्यात आला होता. यंदाही करोनाचा धोका लक्षात घेता वर्धापन दिनाचा सोहळा भव्य स्वरुपात न करता समाजोपयोगी कार्यक्रम राबवून करण्यात येणार आहेत. तसंच, उद्धव ठाकरे शिवसैनिकांसोबत ऑनलाइन संवाद साधणार आहेत. यावेळी उद्धव ठाकरे शिवसैनिकांना काय मार्गदर्शन करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

वाचाः विनाकारण डिवचण्याचा प्रयत्न केलाच तर…; शिवसेनेचा विरोधकांना सूचक इशारा

काही दिवसांपूर्वी भाजपच्या युवा मोर्चाने बुधवारी दादरच्या शिवसेना भवनावर बुधवारी फटकार मोर्चा काढला. यावेळी शिवसैनिकही मोठ्या संख्येने जमा झाल्याने पोलिसांनी आंदोलकांना अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतरही भाजप आणि शिवसेना कार्यकर्ते अचानक भिडल्याने जोरदार हाणामारी झाली होती. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांची भेट घेतली होती. त्यामुळं आजच्या संवादात मुख्यमंत्री या घटनेबाबत भाष्य करणार का?, याकडे लक्ष लागून राहिले आहे.

वाचाःमहिलांसाठी लोकल आधी सुरु होणार?; चहल यांनी दिली मोठी माहिती

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी भाजपसह काँग्रेसनंही तयारी सुरु केली आहे. मुंबई महानगरपालिका हा शिवसेनेचा गड मानला जातो. सातत्याने महापालिकेवर शिवसेना निवडून आली आहे. २०२०मध्ये होणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी भाजप आणि शिवसेनेत आत्तापासूनच चढाओढ लागल्याचे दिसतेय. भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्यानंतर भाजपनं मुंबई महानगरपालिकेत एकहाती सत्ता स्थापन करण्याचा निर्धार केला आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे शिवसैनिकांचे मार्गदर्शन करणार का?, असाही सवाल उपस्थित केला जात आहे.

वाचाः
प्रदीप शर्मानंतर कोणाचा क्रमांक?; मुंबई, ठाण्यातील पोलीस अधिकारी रडारवर

Source link