Home ताज्या बातम्या शिवसेनेचा ‘हा’ माजी आमदार काँग्रेसमध्ये; नाना पटोले म्हणाले…

शिवसेनेचा ‘हा’ माजी आमदार काँग्रेसमध्ये; नाना पटोले म्हणाले…

0
शिवसेनेचा ‘हा’ माजी आमदार काँग्रेसमध्ये; नाना पटोले म्हणाले…

हायलाइट्स:

  • राज्यात काँग्रेस पक्षातही इनकमिंग वाढू लागले.
  • प्रा. शरद पाटील यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र.
  • पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी काँग्रेसमध्ये.

मुंबई: सत्ताधारी महाविकास आघाडीतील पक्षांमध्येही इनकमिंग आणि आऊटगोइंग सुरू आहे. आता धुळे ग्रामीणचे माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत काँग्रेस पक्षात घरवापसी केली आहे. गांधी भवन येथे नाना पटोले यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत माजी नगरसेवक, माजी जिल्हा परिषद सदस्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना पक्षातील शेकडो सदस्यांनीही काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. ( Sharad Patil joins Congress )

वाचा:मराठा आरक्षण: शरद पवार यांच्या भूमिकेवर नारायण राणेंचे प्रश्नचिन्ह

प्रा. शरद पाटील व अन्य पदाधिकाऱ्यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर नाना पटोले यांनी उत्तर महाराष्ट्रात विजयाचा विश्वास व्यक्त केला. ‘काँग्रेस पक्ष हा देशाला तारणारा, सर्व जाती धर्माला बरोबर घेवून जाणारा पक्ष असून भारतीय जनता पक्षाने खोटी स्वप्ने दाखवून देशाला अधोगतीकडे नेण्याचे काम केले आहे. लोकांचा आता भाजपावरचा विश्वास उडाला असून काँग्रेसचा विचारच देशाच्या हिताचा आहे हे लोकांना पटल्यानेच आज धुळे जिल्ह्यातील विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. या पदाधिकाऱ्यांच्या काँग्रेस प्रवेशाने उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेस पक्ष संघटनेला बळकटी मिळून उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसचा झेंडा पुन्हा मानाने फडकत राहील’, असे पटोले म्हणाले.

वाचा: राज्यात निर्बंध कायम; ‘अनलॉक’ विचाराधीन; मंत्री वडेट्टीवार बोलून फसले!

काँग्रेस पक्षाला गतवैभव मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्रपणे काम केले पाहिजे. उत्तर महाराष्ट्र हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता. आता पुन्हा या भागातून लोकसभा, विधानसभेचे प्रतिनिधित्व वाढवून २०२४ मध्ये काँग्रेस स्वबळावर सत्तेत येईल यासाठी काम करा, असे आवाहन करून शरद पाटील यांच्यासह पक्षात प्रवेश केलेल्या सर्वांचे त्यांनी काँग्रेस परिवारात स्वागत केले. यावेळी बोलताना विधिमंडळ पक्षाचे नेते तसेच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची वाटचाल उत्तम सुरू असून काँग्रेसला महाराष्ट्रात गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी सुरु केलेल्या प्रयत्नांसाठी सर्वजण त्यांच्यासोबत आहेत. भाजपाला कंटाळून अनेकजण काँग्रेसमध्ये प्रवेश करत असून आजचा पक्षप्रवेश पाहता धुळे जिल्हा पुन्हा एकदा काँग्रेसमय होण्याची सुरवात झाली असल्याचे चित्र दिसत आहे, असेही थोरात म्हणाले. यावेळी आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी, कार्याध्यक्ष नसिम खान, ज्येष्ठ नेते व माजी मंत्री रोहिदास पाटील, कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, उपाध्यक्ष हुसेन दलवाई उपस्थित होते.

वाचा: ‘मातोश्रीने आमच्यासाठी दार बंद केले; आम्ही मातोश्रीवर जाणे बंद केले नाही’

Source link