‘पुनावालांची कोणीही बदनामी केली नाही; यासाठी ते स्वतः जबाबदार’
राहुल कनवाल यांनी एक ट्वीट केलं आहे. काल वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान मी सीरम इन्स्टिट्यूटला धमकावत असणाऱ्या नेत्याबद्दल बोललो. तो व्हिडिओ शिवसेनेचा नसून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा होता. त्यामुळं झालेल्या गोंधळ आणि मनस्तापासाठी मी दिलगीरी व्यक्त करतो, असं त्यांनी म्हटलं आहे.
चंद्रकांत पाटलांनी माझा कोणता पुतण्या शोधून काढला?: छगन भुजबळ
सुभाष देसाई यांनी काय म्हटलं होतं.
वृत्त वाहिनीवरील एका चर्चेदरम्यान राहुल यांनी शिवसेनेचे गुंड असा उल्लेख केला होता. त्याच्या या वक्तव्यामुळं मोठा वाग रंगला होता. अखेर शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी पत्र लिहित इंडिया टुडे वृत्तवाहिनीकडे कारवाई करण्याची मागणी केली होती. अदर पुनावाला यांना शिवसेनेच्या गुंडांनी लसीसाठी धमकावल्याचे म्हटले. ही गोष्ट धादांत खोटी आणि बदनामीकारक आहे. शिवसेनेची प्रतिमा मलीन करण्याच्या कटाचा हा भाग वाटतो. कदाचित या माध्यमातून सध्या देशभरात सुरु असलेले करोनाचे थैमान आणि विधानसभा निवडणुकीच्या निकाल या विषयांवरील लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असं सुभाष देसाई यांनी म्हटलं होतं.