Home ताज्या बातम्या शिस्तभंग करणाऱ्या नागरिकांवर विश्रांतवाडी पोलीस स्टेशनची कडक कारवाई

शिस्तभंग करणाऱ्या नागरिकांवर विश्रांतवाडी पोलीस स्टेशनची कडक कारवाई

0

पुणे : प्रतिनिधी

कोरोना च्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी निम्म्याहून अधिक शहर सील केले आहेत विश्रांतवाडी पोलिस ठाण्यांतर्गत कळसगांव, आर एन डी रस्ता, मस्के वस्ती, चव्हाण चाळ, श्रमिकनगर, विद्यानगर, भैरवनगर ,आनंद पार्क आणि मुंजोबा वस्ती परिसरातील सर्व अंतर्गत रस्ते बंद करून परिसर सील करण्यात आलेला आहे.

कोरोना चा प्रसार रोखण्यासाठी देशभरात ३ मे पर्यंत ‘ लॉकडाऊन ‘ वाढविण्यात आले असल्यानंतरही विनाकारण घराबाहेर पडणारे चे प्रमाण कमी होताना दिसत नाही. याकरिता विश्रांतवाडी पोलिसांनी लॉकडाऊन च्या काळात ठिकाणी केलेल्या नाकाबंदी दरम्यान लकभक १४०० पेक्षा अधिक दुचाकी व चारचाकी वाहने जप्त केली आहेत.यासाठी जागा पुरत नसल्याने पोलिसांनी आता आळंदी रस्त्याचा अर्धा भाग बंद करून त्या ठिकाणी वाहने लावलेली आहेत.


विश्रांतवाडी पोलीसां कडून विश्रांतवाडी चौकात वाहन तपासणीसाठी नाकाबंदी करण्यात आली आहे.चोक बंदोबस्त राखण्यासाठी पुणे पी -४ चे समन्वयक व रिलायबल एच आर फॅसिलिटीज प्रायव्हेट लिमिटेड चे राज राठोड , दिलीप सोनवणे ,अभिषेक महाडिक यांचे सहकार्य लभले. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक ( गुन्हे) रवींद्र कदम व पोलीस उपनिरीक्षक लहू सातपुते, सहकारी पथक विजय सावंत, विनायक रामाणे, यशवंत किरवे, प्रवीण भालचिम, किशोर दुशिंग ,अनिकेत भिंगारे ,प्रफुल मोरे, शेखर खराडे ,संदीप देवकाते तसेच विश्रांतवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील विशेष ठिकाणी नाकाबंदी व तळ ठोकून लक्ष ठेवून आहे.


यामुळे विनाकारण घराबाहेर फिरणारे यांची वाहने जप्त करण्यात आली आहे. पोलिसांकडून वारंवार सर्व नागरिकांना सूचना देण्यात येत आहे विनाकारण घरा बाहेर फिरू नका व प्रशासनाला सहकार्य करा.