Home शहरे औरंगाबाद शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन प्रेयसीवर बलात्कार

शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन प्रेयसीवर बलात्कार

0

औरंगाबाद : तरुणाने शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन प्रेयसीवर कारमध्ये बलात्कार केल्याची घटना २९ आॅक्टोबर रोजी क्रांतीचौक परिसरात घडली. याप्रकरणी पीडितेने २५ नोव्हेंबर रोजी दिलेल्या फिर्यादीवरून वेदांतनगर पोलीस ठाण्यात तरुणाविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला. 
विक्की गोपाल राठोड (२५, रा.पद्मपाणी कॉलनी), असे गुन्हा नोंद झालेल्या प्रियकर तरुणाचे नाव आहे. विक्की राठोडच्या नातेवाईकाची रेल्वेस्टेशन परिसरात हॉटेल आहे. सहा महिन्यांपूर्वी २८ वर्षीय तरुणी नातेवाईकांसह जेवण्यासाठी गेली होती. तेव्हा विक्की त्यांना भेटला होता. यावेळी विक्कीने तरुणीला त्याचे कार्ड दिले आणि त्यांची हॉटेल घरपोच डिलिव्हरी देते, असे सांगितले होते. 

विक्कीच्या मोबाईलवरून पीडितेने जेवणाची आॅर्डर दिली होती. यामुळे तिचा मोबाईल नंबरही त्याच्याकडे गेला होता. तेव्हापासून ते तिच्याशी सतत बोलत. यानंतर त्यांच्यात घनिष्ठ मैत्री झाली. पुढे मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. यावेळी पीडितेने त्याला आपल्या प्रेमाचे भविष्य काय, असे विचारले असता त्याने तिला लग्न करणार असे सांगितले होते. २९ आॅक्टोबर रोजी रात्री ८ वाजता विक्कीने पीडितेला क्रांती चौकाजवळील खाऊ गल्ली येथे भेटायला बोलावले. पीडिता तेथे दुचाकीने गेल्यानंतर आरोपीने तिला त्याच्या कारमध्ये बसविले. यानंतर त्याने मोकळ्या मैदानावर कार नेऊन उभी केली. तेथे त्याने तिला शीतपेय पिण्यास दिले. 

शीतपेय घेतल्यानंतर तिला गुंगी आल्यावर विक्कीने तिच्यावर कारमध्येच अत्याचार केला. अर्धवट बेशुद्ध तरुणीला हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याने विक्कीच्या कानशिलात लगावली आणि याविषयी जाब विचारला. तेव्हा त्याने तिच्यासोबत लवकरच लग्न करणार असल्याचे सांगून तिला गप्प केले. यानंतर त्याने तिला वेळोवेळी भेटायला बोलावून आणि लग्नाचे आमिष दाखवून रेल्वेस्टेशन रस्त्यावरील अयोध्यानगरी मैदानावर कारमध्ये बसून नेऊन अत्याचार केल्याचे पीडितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले. 

लग्न केल्यानंतर घरात घेण्यास नकार
पीडितेने आरोपीकडे लग्नाचा तगादा लावल्यानंतर गारखेडा परिसरात एकेठिकाणी ५ नोव्हेंबर रोजी आर्यसमाज पद्धतीने लग्न केले. यानंतर त्याने पीडितेला तिच्या आई-वडिलांच्या घरी नेऊन सोडले आणि घरातील नातेवाईकांना लग्न केल्याचे सांगून तुला नेण्यासाठी येतो असे म्हणाला. दुसऱ्या दिवशी त्याने फोन करून आपले लग्न नातेवाईकांना मान्य नसल्याचे सांगितले.