शीला मेहता यांच्या ‘निमित्त’ ने जिंकली पुणेकरांची मने !

- Advertisement -

…………………..सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत बहारदार सादरीकरण
पुणे :
कथक नृत्यांगना ‘ विदुषी ‘ शीला मेहता ( मुंबई ) यांच्या कथक नृत्याच्या ‘निमित्त ‘ या सादरीकरणाने  सोमवारी   पुणेकरांची मने    जिंकली !
‘इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स् , इन्फोसिस फाऊंडेशन आणि भारतीय विद्या भवन यांनी  ‘सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत  संयुक्तपणे आयोजित केलेल्या कार्यक्रमात शीला मेहता आणि अरिशिया पोनेट, मानसी सोमय्या, सुशांत गौरव या त्यांच्या शिष्यांनी   बहारदार नृत्य  सादरीकरण केले. हे सादरीकरण हे ‘ हॉरिझन ‘ या नृत्य सादरीकरण मालिकेचा एक भाग होता.
हा कार्यक्रम भारतीय विद्या भवन, (सेनापती बापट रस्ता ) येथे सोमवारी सायंकाळी ६ वाजता झाला. यावेळी ज्येष्ठ नृत्य गुरु शमा भाटे, पं. सुहास व्यास,इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स् ‘ चे विभागीय व्यवस्थापक एन.के.मलिक उपस्थित होते.


अरिशिया पोनेट यांनी पं. बिरजू महाराज यांचे अर्धनरेश्वर नृत्य सादर केले. मानसी सोमय्या , सुशांत गौरव यांनी शिवशक्ती नृत्य (ताल -झपताल) सादर करून वाहवा मिळवली.
पुरुष आणि स्त्री व्यक्तिमत्वाचे एकत्र प्रतिक बनलेल्या शिखंडी हा  महाभारतातील युद्धात भीष्माचार्यांच्या पराभवाचे निमित्त ठरला. कथाकार शैलीत महाभारतातील हा प्रसंग शीला मेहता यांनी सादर केला. चरणी परंपरेच्या अंगाने त्यांनी हे नृत्य सादर केले.
तेजदीप्ती पावडे यांनी प्रास्ताविक केले, प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी स्वागत केले. शमा भाटे, पं. सुहास व्यास  यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला.
पुणेकरांनी या सर्व नृत्य सादरीकरणांना भरभरून प्रतिसाद दिला

- Advertisement -