Home ताज्या बातम्या शुक्रवारी ठाणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार

शुक्रवारी ठाणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार

0

शुक्रवारी ठाणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार

ठाणे(12): ठाणे महानगरपालिकेच्या पिसे येथील अशुध्द जलशुध्दिकरण केंद्रात पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरु असल्याने शहराला होणारा पाणी पुरवठा शुक्रवार दिनांक 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते शनिवार 15 फेब्रुवारी पर्यंत सकाळी 9 वाजेपर्यंत बंद राहणार आहे.

   राजणोली नाक्याजवळ राष्ट्रीय महामार्गाच्या कामांतर्गत खोदकाम करताना मुख्य जलवाहिनीमधून पाण्याची गळती सुरु झाल्याने  मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम करण्यासाठी शहराला होणारा पाणी बंद राहणार आहे.

    यामुळे पाणी पुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असून, नागरिकांनी पाण्याचा योग्यतो वापर करुन पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.