लॉकडाऊन च्या ९ व्या दिवशी सकाळी ९ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी १३० कोटी जनतेच्या भारतमातेसाठी, सुदृढतेसाठी, सेवेसाठी २१ दिवसांच्या लॉकडाऊन मधील पुढील दिवसात कटाक्षपणे घरी राहून कोरोनाला एकत्र हरवण्याचे आवाहन केले होते.आज ५ एप्रिलला, जनता कर्फ्यू च्या यशानंतर आता कोरोनाशी लढ्यासाठी कोणालाही एकटं वाटू नये, खंबीर रहावं म्हणून अजून एक मागणी मोदींनी जनतेकडून केली होती. ती म्हणजे, आज रविवार ५ एप्रिलला रात्री ९ वाजता सर्वांनी ९ मिनिटे लाईट बंद करून दिवा, मेणबत्ती, टॉर्च, मोबाईल फ्लॅशलाईट, इत्यादींनी प्रकाश करून या कोरोनाच्या अंध:काराला दूर करण्याचे आवाहन त्यांनी केले होते. तसेच यावेळी त्यांनी सुचना देखील केली कि, कोणीही रस्त्यावर न उतरता, सामुहिकपणे न जमता, सोशल डिस्टनसिंग चे पालन करत घराच्या दारातून, बाल्कनीमधून सहभागी होण्याचे आवाहन केले होते.
आज देशभरात कोट्यावधी नागरिकांनी पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला जोरदार प्रतिसाद दिला आहे. तसेच स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशातील करोडो लोकांसोबत या दीप प्रज्वलानात भाग घेतला. त्यांच्या अधिकृत ट्वीटर वर त्यांनी ही माहिती दिली.
शुभं करोति कल्याणमारोग्यं धनसंपदा । शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तुते ॥ म्हणत मोदींनी दीप प्रज्वलन केलं.






















WhatsApp