Home गुन्हा शेअर मार्केटात जास्त व्याजदराने परतावा देण्याचे आमिष दाखवून दोघांनी 400 ग्राहकांना तब्बल 7 कोटी 6 लाख 35 हजारांचा घातला गंडा

शेअर मार्केटात जास्त व्याजदराने परतावा देण्याचे आमिष दाखवून दोघांनी 400 ग्राहकांना तब्बल 7 कोटी 6 लाख 35 हजारांचा घातला गंडा

0

शेअर मार्केटात जास्त व्याजदराने परतावा देण्याचे आमिष दाखवून दोघांनी 400 ग्राहकांना तब्बल 7 कोटी 6 लाख 35 हजारांचा घातला गंडा

पुणे शहरात शेअर मार्केटच्या नावाखाली 18 ते 22 टक्के व्याजदराने परतावा देण्याचे आमिष दाखवून दोघांनी 400 ग्राहकांना तब्बल 7 कोटी 6 लाख 35 हजारांचा गंडा घातल्याचे उघड झाले आहे. 8 नोव्हेंबर 2016 ते 21 सप्टेंबर 2019 दरम्यान ही घटना घडली.

महेशकुमार भगवानदास लोहिया (रा. सिंहगड रस्ता, पुणे) आणि सुनील पुरुषोत्तम सोमानी (रा. बोपोडी) अशी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. रजनी धनंजय मोहिते (वय 51, रा. पिंपळे निलख) यांनी याबाबत खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महेशकुमार आणि सुनील यांचे शुक्रवार पेठेत शिवकन्या इन्व्हेस्टमेंटचे कार्यालय आहे. 8 नोव्हेंबर 2016 मध्ये दोघांनी संगनमत करुन शेअर मार्केटच्या नावाखाली रजनी यांना 18 ते 22 टक्के जादा परताना देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून 10 लाख रुपये घेतले. मात्र, दोघांनी ती रक्कम शेअरमार्केटमध्ये न गुंतविता स्वतःच्या बँकखात्यात जमा केली. तसेच इतर 18 नागरिकांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून त्यांनाही 18 ते 22 टक्के जादा परतावा देण्याचे आमिष दाखविले. त्यांच्याकडून 7 कोटी 6 लाख 35 हजार रुपये गुंतवणूक करुन घेत रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरली. तसेच शेअर मार्केटच्या नावाखाली महेशकुमार आणि सुनीलने मिळून शहरातील विविध भागातील 400 जणांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी आर्थिंक गुन्हे शाखेकडून प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.