औरंगाबाद प्रतिनिधी – नझीमोद्दीन शेख
पैठण तालुक्यातील विहामांडवा येथे एका शेततळ्यात बुडून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. विहामांडवा पासून तीन कीमी अंतर ही कोरडे वस्ती वरील घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, पैठण तालुक्यात मागील दोन दिवसात 9 जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी की सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यात कोरोना मुळे सर्वच कुटुंब घरी किंवा शेतात असल्यामुळे त्यामुळे विहामांडवा येथील कोरडे वस्ती मध्ये मधील रामनाथ निवृत्ती कोरडे यांच्या शेतात गट नंबर 511 मधे लक्ष्मण निवृत्ती कोरडे वय 30 वैभव रामनाथ कोरडे वय 10, सार्थक लक्ष्मण कोरडे वय 6, समर्थ ज्ञानदेव कोरडे 10 अंलकार रामनाथ कोरडे वय9 वर्ष हे शेततळ्यात पोहायला गेले असताना बाहेर येण्याची दोरी तुटल्याने चारही मुले पाण्यात बुडू लागली त्यांना वाचवण्यासाठी लक्ष्मण कोरडे गेले असतात ते ही मुलांना वाचू शकली नाही व मुलांनी त्यांना मीठी मारल्या मुळे ते स्वताही मूलांसह पाण्यात बुडाले त्यामुळे एकाच कुटुंबातील पाच जण बुडाल्याची घटना आजूबाजूच्या लोकांना कळताच त्यांनी शेततळ्यावर धाव घेऊन त्यांना यातून बाहेर काढले व प्राथमिक आरोग्य केंद्र विहामांडवा येथे आणले असता तेथील डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र पाचोड येथे पाठवण्यात आले त्यावेळी पाचोड येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर घुगे यांनी तपासून मृत घोषित केले या घटनेमुळे परिसरात मोठी शोककळा पसरली आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.