शेतीमध्ये भांडवली गुंतवणुकीसाठी दरवर्षी पाच हजार कोटी रुपये देणार – कृषीमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे – महासंवाद

शेतीमध्ये भांडवली गुंतवणुकीसाठी दरवर्षी पाच हजार कोटी रुपये देणार – कृषीमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे – महासंवाद
- Advertisement -

 पुणे, दि.24: शेतकऱ्यांचे जीवन सुरळीत होण्यासाठीत्यांच्या जीवनात सुटसुटीतपणा आणण्यासाठी शासन प्रयत्नशील असून गेल्या सहा महिन्यात 50 ते 55 धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. शेतीला प्रोत्साहन म्हणून शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक करण्यासाठी दरवर्षी पाच हजार कोटी रुपये याप्रमाणे पाच वर्षात 25 हजार कोटी रुपये देण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहेअसे प्रतिपादन कृषिमंत्री केलेल्या ॲड.माणिकराव कोकाटे यांनी केले.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित प्रगतशील व प्रयोगशील शेतकऱ्यांच्या परिसंवादात ते बोलत होते. यावेळी आमदार अभिजीत पाटीलस्मार्टचे प्रकल्प संचालक हेमंत वसेकरसंचालक रफिक नायकवडीसंचालक आत्मा अशोक किरन्नळीप्रक्रिया व नियोजन संचालक विनयकुमार आवटेविभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रय गवसाने तसेच कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ व कृषी  विभागातील अधिकारी उपस्थित होते.

कृषीमंत्री श्री. कोकाटे म्हणालेभांडवली गुंतवणूकीमध्ये कांदा चाळसाठवणगृहेनवीन तंत्रज्ञान यासारख्या शेतकऱ्यांच्या गरजांचा समावेश करण्यात आला आहे. याबाबत धोरण जाहीर करण्यात आले असून त्याचा सविस्तर धोरणात्मक शासन निर्णय येत्या आठवड्याभरात काढण्यात येईल. कृषी क्षेत्रातील भविष्यातील धोरण ठरविण्यासाठी शेतकऱ्यांच्या विचारांचाकल्पनांचा समावेश आवश्यक आहे. त्यादृष्टीने विभागस्तरावर अशा कार्यशाळापरिसंवाद घेण्यात येत असून त्या अंतर्गत आज पुणे विभागीय परिसंवाद आयोजित करण्यात आला. शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी शासन सकारात्मक असून अस्थिरता दूर करण्यासाठी शासन आणि शेतकऱ्यांनी एकत्रितपणे सामोरे जाण्याची आवश्यकता आहे.

ते म्हणालेशेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) तंत्रज्ञानाचा वापर होण्यासाठी अर्थसंकल्पात 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून आवश्यकता भासल्यास पुरवणी मागण्यांमध्ये वाढीव निधीची तरतूद करण्यात येईल. कृषी विभागाने योजनांची प्रचारप्रसिद्धी करावी. शासनाच्या सुविधायोजना शेतकऱ्यांपर्यंत लवकरात लवकर पोहोचविण्यासाठी तसेच शेताच्या बांधावर जाऊन समस्या जाणून घेण्यात येतील.  शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेण्यात आले असून योजनांच्या लाभाची रक्कम धनादेशाद्वारे न देता डीबीटीद्वारे खात्यात जमा करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सेंद्रिय शेती करावीअसे आवाहन त्यांनी केले. ते म्हणालेसंशोधन केंद्रामध्ये शेतकऱ्यांच्या आवश्यकतेनुसार विविध वाणरोपे उपलब्ध करुन द्यावीत. पुणे जिल्ह्यात कृषी प्रदर्शनासाठी कायमस्वरूपी वातानुकूलित हॉल बांधण्यात येईल.

या परिसंवादात विविध पीक उत्पादक 20 कंपन्या व शेतकरी यांच्यासोबत सुमारे 5 तास गटचर्चा करण्यात आली. यामध्ये गुणवत्तेनुसार कांद्याला हमीभावमागेल त्याला कांदा चाळआंतरमशागतीसाठी अत्याधुनिक कृषी अवजारेऊस पिकासाठी सुधारित तंत्रज्ञाननवीन वाणकेळी उत्पादन वाढीसाठी नवनवीन प्रयोगप्रक्रिया उद्योगांसाठी चालनाज्वारी वरील प्रक्रिया उद्योगडाळिंबद्राक्षे आदींसाठी सुविधामका पिकाला हमीभावउत्पादित माल साठवणुकीसाठी गोडाऊनसेंद्रिय उत्पादनाचे प्रमाणीकरणदेशी गाई पाळण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदानअंजीर फळाचा फळपिक विमा योजनेमध्ये समावेशअंजीर सुकवण्यासाठी संशोधन केंद्रास वाढीव निधीआंब्यासाठी हमीभावभाजीपाला उत्पादकांना ऑनलाइन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणेसंरक्षित शेतीसेंद्रिय उत्पादित मालासाठी स्वतंत्र बाजारपेठतूर आयात निर्यात धोरणामध्ये सुस्पष्टता आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.

या परिसंवादात पुणेसोलापूर व अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.

****

- Advertisement -