Home बातम्या ऐतिहासिक शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच शैक्षणिक सुविधांचा विस्तार करणारा अर्थसंकल्प – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच शैक्षणिक सुविधांचा विस्तार करणारा अर्थसंकल्प – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

0
शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच शैक्षणिक सुविधांचा विस्तार करणारा अर्थसंकल्प – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. ११ शैक्षणिक क्षेत्राची क्षमता वाढवून शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच  शैक्षणिक सुविधांचा विस्तार करण्यासाठी या अर्थसंकल्पात उच्च व तंत्र शिक्षण विभागासाठी 1619 कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे अशी प्रतिक्रिया उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पावर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांचे अभिनंदन केले.

भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय स्थापन करण्याचे जाहीर करण्यात आले होते, त्यासाठी 100 कोटी रुपये अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आले आहेत. तसेच एसएनडीटी महिला विद्यापीठ, सिडनमहॅम कॉलेज, एल्फिन्स्टन महाविद्यालय यांच्यासाठी प्रत्येकी 5 कोटी रुपये मंजूर केले आहेत.

कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातील यशवंतराव चव्हाण ग्रामविकास प्रशाला, राजर्षी शाहू महाराज संशोधन केंद्र व संग्रहालय संकुल यासाठी 10 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

अर्थसंकल्पात- रत्नागिरी, सिंधुदुर्गसाठी भरीव तरतूद

  • रत्नागिरीमध्ये विमानतळाच्या भूसंपादन आणि बांधकाम करण्यासाठी 100 कोटी रुपये तरतूद केली आहे. तसेच 100 खाटांचे महिला रुग्णालय मंजूर झाले आहे.
  • -मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र रत्नागिरी येथे होणार असून त्यासाठी 2 कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
  • दापोली येथील बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठासाठी 50 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
  • स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत ऐतिहासिक शाळांचा विकास करण्यात येणार आहे. या अंतर्गत मुरुड (जि रत्नागिरी) हे महर्षी धोंडो केशव कर्वे आणि पालगड (जि रत्नागिरी) हे साने गुरुजी यांचे असलेल्या गावातील शाळांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
  • राज्यातील किल्याच्या संवर्धनसाठी 14 कोटी रुपयांची तरतूद केली आहे आहे. यामध्ये विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग किल्ल्याचा समावेश आहे.
  • रत्नागिरी येथील विमानतळासाठी भूसंपादन आणि बांधकाम यासाठी 100 कोटी रुपये

राज्यातील सर्वच घटकांना आणि सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प आहे. राज्यातील शेतकरी, विद्यार्थी, वंचित, कामगार, आदी सर्व घटकांच्या विकासाला चालना देणारा हा अर्थसंकल्प आहे अशी प्रतिक्रिया श्री. सामंत यांनी यावेळी दिली.

०००००