Home ताज्या बातम्या श्रावण सोहळ्याचा डी. ई. एस. स्कूलमधील मुलांनी व पालकांनी लुटला आनंद.

श्रावण सोहळ्याचा डी. ई. एस. स्कूलमधील मुलांनी व पालकांनी लुटला आनंद.

0

पुणे : परवेज शेख

श्रावण महिना म्हणजे सणांचा, चैतन्याचा महिना. या महिन्यात अनेक सण आपण उत्साहात साजरे करतो. अशाच उत्साहात डि. ई. एस पूर्व प्राथमिक शाळेत नुकतीच “श्रावणी मौज” पार पडली. श्रावणी मौज म्हणजे गायन, वादन आणि नर्तन यांचा मिलाफ. या कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्याम्हणुन हुजूरपागा प्रशाला, शिशु मंदिर विभागाच्या माजी मुख्याध्यापिका सौ. स्नेहल भावे यांच्या दीप प्रज्वलनाने झाली. पाठोपाठ लहान मुलांनी श्रावण महिन्यातील सणांवर नाच सादर केले. नागपंचमी, वटपौर्णिमा या सणांचे महत्व नाच गाण्यातून आणि ते आधुनिक पद्धतीने कसे साजरे करावे हे पटवून दिले. सध्याच्या जीवन पद्धती आपण मंगळागौरीचे जुने खेळ, गाणी. उखाणे विसरत चाललो आहोत पण छोट्या मुलींनी सर्वांसमोर हे खेळ खेळून प्रेक्षकांच्या जुन्या आठवणी जाग्या केल्या. कार्यक्रमाचा समारोप श्री विष्णुचे दशावतार दर्शन आणि दहीहंडी फोडून “पाणी वाचवा” असा संदेश दिला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीनियर केजी मधील मुलामुलींनी धीटपणे केले. या कार्यक्रमात सर्व शिक्षिकांचा उस्फूर्त सहभाग होता. योगायोग म्हणजे मॅडम मॉटेसरी यांचाही जन्मदिन दुसर्‍या दिवशी होता. सणांचे महत्व व ते साजरे करण्यामागे शास्त्रीय महत्व विद्यार्थ्यांना माहीत व्हावे या हेतूने या सोहळ्याचे आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ माधुरी बर्वे यांनी केले होते.