“श्रीयश सर्व्हिसेस” कडून रांजणगाव व शिरूर पोलिसांना सुरक्षा साधनाचे वाटप

- Advertisement -

पुणे : प्रतिनिधी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू असताना पुणे ग्रामीण कार्यक्षेत्रातील रांजणगाव एमआयडीसी व शिरूर पोलीस स्टेशन आणि हद्दीतील १० नाकाबंदी ठिकाणी करोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी रात्रंदिवस कार्यरत असलेल्या पोलीस बांधवाना, सुरक्षा कर्मचारी यांना “श्रीयश सर्व्हिसेस” व पी-४ च्या माध्यमातून एक सामाजिक बांधिलकी जपत पी. पी.ई किट व पाणी वाटप करण्यात आले.

रांजणगाव पोलीस स्टेशन चे एपीआय श्री. पाटील साहेब तसेच शिरूर पोलीस स्टेशन चे एएसआय श्री.कोलते साहेब यांनी “श्रीयश सर्व्हिसेस” व पी-४ च्या संस्थेच्या कार्याचे तोंडभरून कौतुक करून सुरक्षा सेवाकार्याची प्रशंसा केली यावेळी त्यांनी तेथील स्वयंसेवकांशी संवाद साधून त्यांचा उत्साह वाढविला.

पी-४ च्या अधिकृत संस्थेच्या जिल्यातील १२९ सुरक्षा एजेन्सीच्या मालकांना एकत्रीत करून पोलीस प्रशासनासोबत सुरक्षा सेवेच्या कर्तव्याबरोबरच सामाजिक उपक्रम राबविण्याचे काम देखील पी-४ च्या माध्यमातून करीत आहेत असे पी-४ चे मुख्य समन्वयक सचिन मोरे यांनी सांगितले.

“श्रीयश सर्व्हिसेस” चे मालक श्री.सुरेश डाळींमकर यांनी सांगितले कि अत्यावश्यक सेवेमधील सुरक्षा कर्मचार्यांकडून प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेण्यासाठी माहिती व सूचना ज्या केल्या आहेत त्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या साह्याने सर्व ठिकाणी पोचवत आहोत. म्हणून व प्रत्येकी पोलीस ठाण्याला २० बॉक्स पाणी, १५ ली सेनीटायझर,१०० मास्क देण्यात आले. आपत्ती व्यवस्थापन शाखा यांच्या माध्यमातून करोना आजाराचे संक्रमण थांबविण्यासाठी या विषाणूंचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखणेसाठी अत्यावश्यक उपाय योजने मध्ये पुणे जिल्ह्यातील पोलीस प्रायव्हेट सिक्युरिटी पार्टनरशीप प्रोग्रॅम (पी-४) च्या माध्यमातून जवळपास सर्व पोस्ट वरती सुरक्षा कर्मचारी दिवसरात्र पोलीस कर्मचार्याच्या सोबत कर्तव्यावर देण्यासाठी ठाम आहोत.

या वाटप प्रसंगी पी-४ संस्थेचे सर्व समन्वयक उपस्थित होते, खाजगी सुरक्षा संस्थेच्या मालकांनी सुरक्षित पुणे करण्यासाठी या महासंकटसमयी करीत असलेल्या कार्याला तोड नाही. भविष्यात जर गरज पडली तर पी-४ पुन्हा काही संसाधने उपलब्ध करून देईल, असा विश्वास सर्व चालकांनी त्यावेळी व्यक्त केला.

- Advertisement -