संगीतकार सलील चौधरी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त उद्या माटुंग्यात कार्यक्रम – महासंवाद

संगीतकार सलील चौधरी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त उद्या माटुंग्यात कार्यक्रम – महासंवाद
- Advertisement -

संगीतकार सलील चौधरी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त उद्या माटुंग्यात कार्यक्रम – महासंवाद

मुंबई, दि. ७ : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या वतीने संगीतकार सलील चौधरी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या लोकप्रिय गीतांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार 8 मार्च, 2026 रोजी रात्री 8:15 वाजता यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा, मुंबई येथे होणार आहे.

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमात संगीतकार सलील चौधरी यांच्या लोकप्रिय गीतांचा समावेश आहे. यामध्ये गायक म्हणून राना चॅटर्जी, सरीता राजेश, सन्नी सिंग, संगीता मेलेकर यांचा सहभाग आहे. कार्यक्रमाचे समन्वय योर इंडीयन मेलोडीज ही करत आहेत. हा कार्यक्रम रसिक प्रेक्षकांसाठी विनामूल्य असून संगीतकार सलील चौधरी यांच्या लोकप्रिय गीतांचा आस्वाद सर्वांनी घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.

०००

- Advertisement -